Weather

बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील 'घटमांडणी'तून वर्षभराचा हंगाम, पीक, पाऊस, अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था व राजकीय घडामोडीचे भाकीत केले जाते. गेल्या ३५० वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला ही परंपरा जोपासली जाते, असा दावा बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ परिसरातील शेतकरी करतात. भेंडवळच्या या भविष्यवाणीकडे संपूर्ण राज्याचं खासकरून शेतकऱ्याचं लक्ष लागलेलं असतं. या मांडणीतून जाहीर केलेल्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते.

Updated on 23 April, 2023 11:57 AM IST

चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी निरीक्षणे करून यंदाचा अंदाज जाहीर केला. या प्रथेला वैज्ञानिक आधार नाही. मात्र, शेतकरी यावर मोठा विश्वास ठेऊन आपल्या वर्षभराचं शेतीविषयक नियोजन या प्रथेनुसारच करतात.

संपूर्ण राज्यातील शेतकऱ्याचे लक्ष लागून असलेली बुलढाण्यातील " भेंडवळची घटमांडणी " चे अंदाज आज जाहीर करण्यात आले आहे.काळ अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडलेली होती. घटमांडणीत वर्तवण्यात आलेल्या अंदाजावरून राज्यातील शेतकरी आपल्या वर्षभराचं पीक पाण्याचे नियोजन करीत असतात त्यामुळे या गट मांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असतं... पाऊस ,पीक परिस्थिती , हवामान , राजकीय , आर्थिक, संरक्षण व सामाजिक परिस्थिती याचा वेध घेणारी ही भेंडवळची घटमांडणीचे हे अंदाज आज वर्तविण्यात आले आहेत.

पावसा संबंधीचे अंदाज

जून - कमी , पेरणी उशिरा होईल
जुलै - सर्वसाधासरण
ऑगस्ट - चांगला , अतिवृष्टी होईल
सप्टेंबर - कमी , अवकाळी पाऊस भरपूर, पिकांचे नुकसान होईल

जगातील सर्वात महाग बटाटा! किमतीत महिन्याभराचे रेशन येईल, किंमत वाचून डोळे होतील पांढरे

पीक पाण्यासंबंधीचे अंदाज

आंबाशी कुलदैवत आहे त्यामुळे रोगराई राहील ..

कपाशी मोघम आहे फारशी तेजी नाही

ज्वारी सर्वसाधारण राहील

तूर मोघम पिक चांगले

मुग मोघम सर्वसाधारण

उडीद मोघम सर्वसाधारण

तील मोघम मात्र नासाडी होईल

बाजरी सर्व साधारण मात्र नासाडी होईल

भादली रोगराई वाढेल

साळी- तांदूळ चांगलं पिक येईल

मटकी - सर्व साधारण येईल

जवस - सर्व साधारण मात्र नासाडी होईल

गहू - सर्व साधारण बाजार भाव तेजीत राहील

हरभरा - अनिश्चित कमी जास्त पिक येईल.. मात्र नुकसान सुद्धा होईल

बाजरीपासून तयार केलेले हे पेय पोटाला गारवा देईल, हे पिण्याचे अनेक फायदे...

English Summary: Bhendval's Famous Prophecy Announced; How will the rain water be this year?
Published on: 23 April 2023, 11:57 IST