Weather

राज्यात एक जून ते २७ ऑगस्ट दरम्यान ७०९.५ मिलिमीटर म्हणजेच सरासरी पेक्षा आठ मिलिमीटर कमी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा २१ टक्के कमी पाऊस झाला आहे.

Updated on 01 September, 2023 9:26 AM IST
AddThis Website Tools

Weather News :

राज्यातील कोकण भाग वगळता इतर भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. यामुळे आगामी काळात शेती संकटात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. तसंच पाणी आणि पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

राज्यात एक जून ते २७ ऑगस्ट दरम्यान ७०९.५ मिलिमीटर म्हणजेच सरासरी पेक्षा आठ मिलिमीटर कमी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा २१ टक्के कमी पाऊस झाला आहे. तर मराठवाड्यात सरासरीपेक्षा १८ टक्के कमी पाऊस झाला आहे. तर विदर्भात सरासरीपेक्षा ९ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

मराठवाडातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचं गंभीर संकट ओढावले आहे. धरणांमधील पाणीपातळी मोठी घट झाली आहे. आठ जिल्ह्यातील ७६ तालुक्यांत यंदा पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे. तसंच शेती सिंचनासाठी सुद्धा पाणी वापरण्यावर आता बंधने येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्याच्या अनेक भागात अद्यापही पावसाची विश्रांती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा कायम आहे. आज (ता.२८) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. 

English Summary: Below average rainfall in the state Know how the future will be
Published on: 28 August 2023, 03:18 IST