Weather

आपल्या अचूक हवामान अंदाजासाठी महाराष्ट्राला परिचित असलेले नाव म्हणजे पंजाबराव डख हे होय. महाराष्ट्रातील शेतकरी बांधव पंजाबराव यांच्या हवामान अंदाजाकडे कायमच लक्ष ठेवून असतात. त्यांचा एक नवीन सुधारित मान्सून अंदाज आला आहे.तो आपण या लेखात बघू.

Updated on 21 June, 2022 10:46 AM IST

आपल्या अचूक हवामान अंदाजासाठी महाराष्ट्राला परिचित असलेले नाव म्हणजे पंजाबराव डख हे होय. महाराष्ट्रातील  शेतकरी बांधव पंजाबराव यांच्या हवामान अंदाजाकडे कायमच लक्ष ठेवून असतात. त्यांचा एक नवीन सुधारित मान्सून अंदाज आला आहे.तो आपण या लेखात बघू.

 पंजाबरावांचा हवामान अंदाज

 त्यांच्या मते राज्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली असून एकोणावीस जून पासूनच मोसमी पाऊस महाराष्ट्रात पडत आहे असे त्यांनी नमूद केले.

राज्यात दोन जुलै पर्यंत भाग बदलत पाऊस कोसळणार असल्याचे देखील पंजाबराव यांनी नमूद केले. त्याचा अर्थ दोन जुलै पर्यंत राज्यात सर्वदूर मौसमी पाऊस कोसळणार आहे.

तसेच त्यांच्या मते, 22 ते 27 जून या दरम्यान राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे.

नक्की वाचा:Mansoon Update: मध्य महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा जोर वाढणार, पहाटपासून मुंबई परिसरात पावसाचे आगमन

म्हणजेच त्यांच्या अंदाजानुसार उद्यापासून राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. त्यांच्या या अंदाजामुळे शेतकरी बांधवांना नक्कीच दिलासा मिळेल व त्यांच्या चेहर्‍यावर समाधान देखील पाहायला मिळेल

अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या पावसाअभावी बाकी असून अशा शेतकऱ्यांना देखील या पावसाचा फायदा होऊन राज्यात लवकरच सर्वदूर पेरणीच्या कामाला वेग मिळेल.

तसेच पंजाब रावांनी शेतकरी बांधवांना सल्ला दिला आहे की, शेतातील ओल तपासूनच पेरणी करावी.

नक्की वाचा:पावसाची ताजी बातमी! 'या'तारखेपासून राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होण्याचे संकेत,मिळू शकतो शेतकऱ्यांना दिलासा

जमिनीत चार बोट ओल असेल तर पेरणी करू नका असे देखील मत पंजाबराव यांनी यावेळी मांडले.अशाच पद्धतीचा सल्ला राज्याच्या कृषी विभागाने देखील शेतकरी बांधवांना दिला आहे.

पेरणी करण्यासाठी घाई न करता 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी असे कृषी विभागाने म्हटले आहे.सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेरणीच्या कामांना वेग आला असून अनेक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली

असल्याने आता लवकरच राज्यांमध्ये सर्वत्र खरीप हंगामातील पेरणीची कामे पटापट पूर्ण होतील असा अंदाज आहे.पंजाब रावांच्या या अंदाजामुळे शेतकरी बांधवांच्या पावसा बद्दलच्या अपेक्षा आणि आशा पल्लवित झाल्या आहेत.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो थांबा!! राज्यात केवळ एक टक्केच पेरणी, पावसाअभावी पेरण्या थांबल्या...

English Summary: an improvise meterological guess of punjaabrao dakh that important for farmer
Published on: 21 June 2022, 10:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)