Unseasonal Rains in Maharashtra : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावलीये. या अवकाळी पावसामुळं शेतकरी मात्र चांगलेच धास्तावले आहेत. कारण, अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालं आहे. तर, काही ठिकाणी पिकांचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे. 20 मार्चपर्यंत म्हणजे आणखी पुढचे तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान राज्यात मराठवाडा, कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भात गारपिटासह पावसाची शक्यता आहे. याचबरोबर अन्य काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील मराठवाड्यामध्ये हिंगोली, नांदेड, लातूर. या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर वादळी पावसाचा इशारा कोकणमधील पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या भागात पाऊस होणार आहे.
तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव याभागात विजांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम. यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात 20 मार्चपर्यंत अवकाळीसह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. या अवकाळीनं बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालंय. तर मराठवड्यात पावसाचे पाच बळी गेले आहेत.
सरकार या दिवशी पीएम किसानचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवणार
गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाचा हजारो हेक्टरवरील पिकांना फटका बसला तर काही ठिकाणी पिकांचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आणखी तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.
अवकाळी पावसाला सुरुवात झालीय. यामुळे गहू, ज्वारी,कांदा या पिकाचे नुकसान होत आहे. सेनगाव परिसरात सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे संत्रा बागेतील काही झाड मोडून पडलीत. अवकाळी पावसामुळे शेतकरी नव्या आर्थिक संकटात सापडलाय.
मोफत आधार अपडेट करण्याची सुवर्णसंधी! ऑनलाइन आणि ऑफलाइन काय अपडेट केले जाऊ शकते ते जाणून घ्या
Published on: 18 March 2023, 09:33 IST