Weather

राज्यात सुरू असलेल्या पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. मात्र आता पुनः एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने धमाकुळ घातला होता. आता उद्यापासून पुनः जोर वाढण्याची शक्यता आहे.

Updated on 22 July, 2022 9:44 AM IST

राज्यात सुरू असलेल्या पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. मात्र आता पुनः एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने धमाकुळ घातला होता. आता उद्यापासून पुनः जोर वाढण्याची शक्यता आहे.

उद्यापासून 23 जुलै राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस (heavy rain) पडण्याचा इशारा हवामान विभागानं (Meteorology Department) दिला आहे. पुढील चार दिवस मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी काळजी घ्यावी असा इशारा दिला आहे.

पशुपालकांसाठी आनंदाची बातमी; आता गाईच्या शेणानंतर सरकार खरेदी करणार गाईचे गोमूत्र

राज्यात मुंबईसह कोकण, नाशिक आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस (heavy rain) पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत रविवार आणि सोमवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुसळधार पावसानंतर सध्या गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे.

मोजक्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. तर उर्वरित ठिकाणी पावसानं उघडीप घेतली होती. अशातच आता हवामान विभागानं उद्यापासून मुसळदार पावासाचा इशारा दिला आहे. त्यामुळं राज्यात उघडीप दिलेला पाऊस पुन्हा एकदा हजेरी लावणार आहे.

मोठी बातमी; अकाऊंटमध्ये झीरो रक्कम असली तरी काढता येणार, पहा प्रोसेस..

राज्याच्या काही भागात पावसाचा जोर कमी 

कालपासून काही प्रमाणात पावसाचा जोर कमी आला आहे. बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसानं धुमकूळ घातला आहे. पावसामुळं अनेक ठिकाणी जनजजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, हळूहळू पूरस्थिती नियंत्रणात येत आहे. दुसरीकडं कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून वरुणराजाने उघडीप दिल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या 
शेतकरी मित्रांनो: मटक्यात मशरूम वाढवून व्हा करोडपती; हा आहे सोप्पा उपाय
आताची सर्वात मोठी बातमी ; आता शेतकऱ्यांना मिळणार डिझेलमागे 60 रुपयांचे अनुदान
Ration Machine : बापरे बाप ! आता एटीएम मधून मिळणार गहू, तांदूळ ; ग्राहकांना मिळणार रेशन मशीन

English Summary: Alert Four days heavy rain including Konkan Mumbai
Published on: 22 July 2022, 09:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)