Weather

Punjab Dakh Havaman Andaj: देशात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा जोरदार प्रवास सुरु आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेकडो नागरिकांचे जीव गेले आहेत. तर काही ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

Updated on 26 August, 2022 2:32 PM IST

Punjab Dakh Havaman Andaj: देशात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा (Monsoon) जोरदार प्रवास सुरु आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) शेकडो नागरिकांचे जीव गेले आहेत. तर काही ठिकाणी शेतीचे (Farming) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

पंजाबराव यांच्या अंदाजात म्हंटल आहे की सध्या राज्यात सर्वत्र पावसाची उघडीप पाहायला मिळत मात्र २८ ऑगस्टला लातूर आणि नांदेड तसेच विदर्भात पुन्हा हवामानात बदल होऊन मुसळधार पाऊस कोसळणार आहे.

पंजाबराव डख यांनी विदर्भात आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शेतातील कामे (Farming Work) उरकून घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रात (Maharashtra) पावसाची उघडीप पाहायला मिळणार आहे. त्यामुळे इतर भागातील शेतकऱ्यांना शेती कामे करता येणार आहेत.

गोपालखेड येथे जैविक कृषी निविष्ठा केंद्राचे उदघाटन; शेतकऱ्यांना होणार फायदा...

येत्या काही दिवसांत गणपतीचे आगमन होणार आहे. राज्यात गणपतीच्या दिवसांत काही भागात मुसळधार पाऊस पडतो. पंजाबरावांनी या दिवसांमध्ये मौसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याचे सांगितले आहे.

राज्यात येत्या ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर पर्यंत पाऊस पडणार असल्याचे पंजाबरावांनी सांगितले आहे. काही दिवस पावसाची उघडीप असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची संपूर्ण कामे उरकून घ्यावीत. तसेच पिकांची देखील काळजी या दिवसांमध्ये घेण्याचे आव्हान पंजाबराव डख यांनी केले आहे.

सर्वोत्कृष्ट दूध उत्पादकाला केंद्र सरकार देणार 5 लाख रुपयांचे बक्षीस; 15 सप्टेंबरपर्यंत असा करा अर्ज

मान्सूनचा पाऊस काही भागात बरसला नसल्यामुळे आता शेतकरी मौसमी पावसाची वाट पाहत आहेत. समाधानकारक पाऊस पडला नसल्यामुळे अनेक भागात शेती कामे रखडली आहेत. तसेच खरीप पिकांची पेरणी झालेली पिके पाऊस नसल्यामुळे सुकायला लागली आहेत.

महत्वाच्या बातम्या:
Tomato Rate: टोमॅटो उत्पादकांचे येणार अच्छे दिन! दर पुन्हा कडाडण्याची शक्यता...
7th Pay commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका! महागाई भत्त्याबाबत सरकारने दिली ही माहिती...

English Summary: Ala Re Ala Panjabrao guessed; Heavy rain will fall at this place
Published on: 26 August 2022, 02:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)