Monsoon 2023 :- सध्या राज्यामध्ये सगळीकडे पावसाने उघडीप दिली असून काही ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावल्याचे सध्या चित्र दिसून येत आहे. जुलै महिन्यामध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला. परंतु तरी देखील बरेच भागात कमी पाऊस झाल्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या पिकांना आता पावसाची खूप गरज आहे.
त्यामुळे शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत असताना मात्र गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पावसाने उघडीप दिली आहे. याच पार्श्वभूमीवर जर आपण हवामान विभागाचा येणाऱ्या चार ते पाच दिवसांचा अंदाज पाहिला तर तो देखील पावसाच्या बाबतीत काहीसा शेतकऱ्यांची चिंता वाढवणारच आहे.
हवामान विभागाचा पुढील पाच दिवसांचा अंदाज
हवामान विभागाने येणाऱ्या पुढील पाच दिवसांचा अंदाज व्यक्त केला असून यानुसार राज्यामध्ये पावसाने जे काही उघडीप दिली आहे ती कायम राहणार आहे. सध्या राज्यातील बऱ्याच भागांमध्ये उन्हाची तीव्रता वाढली असून या पावसाच्या उघडीपीच्या कालावधीमध्ये आता खरीप पिकांच्या अंतर मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे.
सध्या राज्यातील बऱ्याच भागांमध्ये कमी पाऊस झाल्यामुळे पिकांना पावसाचे नितांत आवश्यकता असताना मात्र सध्या राज्यात पाऊस थांबला आहे. येणाऱ्या पुढील चार ते पाच दिवस ही स्थिती राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर आपण राज्यातील मराठवाड्यातील जालना, बीड तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर आणि पुणे व अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर इत्यादी जिल्ह्यांच्या बऱ्याच भागांमध्ये चांगला पाऊस अजून पर्यंत झालेला नाही.
त्यामुळे पिकांच्या चांगल्या वाढीसाठी या ठिकाणी जोरदार पावसाची आवश्यकता आहे. परंतु आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस देखील पावसाची उघडीप कायम राहण्याचा अंदाज आहे. बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे परंतु तो पुरेसा नाही. परंतु सध्यातरी राज्याच्या सर्वदूर भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Published on: 09 August 2023, 08:54 IST