Weather

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी अजूनही पिके पाण्याखालीच आहेत. त्यामुळे ही पिके सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाचा अचूक अंदाज हवामान खात्याकडून दिला जातो.

Updated on 25 August, 2022 4:57 PM IST

महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Damage to crops) झाले आहे. तर काही ठिकाणी अजूनही पिके पाण्याखालीच आहेत. त्यामुळे ही पिके सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाचा अचूक अंदाज हवामान खात्याकडून दिला जातो.

मात्र जिंतूर तालुक्यातील सांवगी म्हाळसा येथे शासनाचा गजब कारभार पाहायला मिळत आहे. कारण पावसाचा अचूक अंदाज लावण्यासाठी अनेक ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र (Rain gauge) लावले जाते. मात्र या गावात येड्या बाभळीच्या झुडपात पर्जन्यमापक यंत्र लावण्यात आले आहे.

पर्जन्यमापक यंत्र काटेरी झुडपात (thorn bushes) लावल्यामुळे पावसाचा अचूक अंदाज येत नाही. त्यामुळे या भागांमध्ये किती पाऊस झाला याची नोंद होत नाही. अतिवृष्टीच्या निकषांमध्ये येथील शेतकरी बसत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.

PM Kisan: सावधान! पीएम किसान लाभार्थ्यांनो या चुकीमुळे मिळणार नाही १२ वा हफ्ता...

हे पर्जन्यमापक यंत्र ऑनलाईन असल्यामुळे २० हुन अधिक गावांच्या पावसाची नोंद येथे केली जाते. पाऊस मोजण्याची ही यंत्रणा शासकीय असून महावेध या पोर्टलवर पावसाची आकडेवारी जाहीर केली जाते. मात्र गेल्या ३ वर्षांपासून कृषी आणि महसूल विभागाकडून पर्जन्यमापनाचे काम केले जात जात नाही.

पर्जन्यमापक यंत्र लावलेल्या भागात किती पाऊस झाला याची नोंद या यंत्राद्वारे केली जाते. यावर्षीही महसूल अथवा कृषी विभागाचे कर्मचारी याची नोंद घेऊन वरिष्ठ कार्यालयात पाठवित होते. मात्र, मॅन्युअली आणि तांत्रिक पद्धती यातील आकडेवारीत मोठ्या प्रमाणात तफावत येत असल्याचे गतवर्षी निदर्शनास आलेले आहे.

ऊस शेतीच्या तुलनेत 40 पट अधिक नफा! स्टीव्हिया औषधी वनस्पतीची लागवड करा आणि ५ वर्षे भरघोस नफा मिळवा...

त्यामुळे एका खासगी कंपनीकडून जिल्ह्याच्या महसूल मंडळाच्या ठिकाणी आधुनिक पर्जन्यमापक बसविले आहेत. त्याची आकडेवारी महावेध या पोर्टलवर जाते. तेथून ऑनलाइन पद्धतीने त्या-त्या तालुक्यात पाहायला मिळते.

पर्जन्यमापक काटेरी झुडपात लावल्यामुळे किती पाऊस झाला याचा अचूक अंदाज आला नाही. या यंत्राद्वारे कमी पाऊस झाला असल्याची नोंद झाली होती. मात्र या गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. शासनाच्या अजब कारभारामुळे येथील शेतकऱ्यांना कोणताही विमा किंवा नुकसान भरपाई मिळालेली नाही.

चुकीच्या ठिकाणी बसवलेल्या पर्जन्यमापक यंत्रामुळे येथील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. कारण मुसळधार पावसाने पिके गेली तरीही कमी पावसाची नोंद सरकारी कार्यालयांमध्ये होत आहे. आता नुकसान भरपाई मिळणार की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे?

महत्वाच्या बातम्या:
लातूरमध्ये तब्बल १ लाख लाभार्थी ई-केवायसीविनाच! मुदत संपत आली तरीही शेतकऱ्यांची ई-केवायसीकडे पाठ
भाजीपाल्याचे दर कडाडले! आवक घटल्याने दरात वाढ

English Summary: A rain gauge has been installed in the acacia bushes
Published on: 25 August 2022, 04:57 IST