Weather

कोकणात ११० टक्के पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात ८७ टक्के पाऊस, मराठवाड्यात देखील ८७ टक्के पाऊस आणि विदर्भात ९७ टक्के पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

Updated on 30 September, 2023 11:46 AM IST

Monsoon Return : राज्यात यंदा कुठे जास्त तर कुठे कमी पाऊस झाला आहे. जून-जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला असला तरी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये राज्यात कमी पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहेत. तसंच १ जून ते ३० सप्टेंबर पर्यंत राज्यात ९६ टक्के पाऊस झाला आहे. तर देशात सरासरी ९४ टक्के पाऊस झाला आहे. महाराष्ट्र आणि केरळ राज्यात पावसाची तूट झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

राज्याच्या कोणत्या भागात किती पाऊस?
कोकणात ११० टक्के पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात ८७ टक्के पाऊस, मराठवाड्यात देखील ८७ टक्के पाऊस आणि विदर्भात ९७ टक्के पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. तसंच परतीच्या मान्सूनने देखील परतण्यास सुरुवात केली आहे. यामुळे परतीचा पाऊस तरी चांगला व्हावा,अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.

९ जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट
राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा पाऊसाची तूट झाली आहे. यात सांगलीत सरासरीच्या फक्त ५६ टक्के पावसाची नोंद झाली. साताऱ्यात देखील सरासरीच्या ६२ टक्के पावसाची नोंद, सोलापुरात ६९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील चार जिल्ह्यात पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. यात बीडमध्ये सरासरीच्या ७७ टक्के पावसाची नोंद, संभाजीनगरात ८७ टक्के, धाराशिवमध्ये सरासरीच्या ७१ टक्के पावसाची नोंद, जालन्यात सरासरीच्या फक्त ६७ टक्के पाऊस, हिंगोलीत सरासरीच्या ७६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. विदर्भातील दोन जिल्ह्यात मोठी तूट निर्माण झाली आहे. अकोल्यात सरासरीच्या ७५ टक्के पाऊस तर अमरावती जिल्ह्यात ७३ टक्के पावसाची नोंद झाली.

दरम्यान, राज्यात यंदा ९ जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट झाली आहे. तसंच राज्यात देखील कमी पाऊस झाला आहे. यामुळे आगामी काळात पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. परतीच्या मान्सूनला सुरुवात झाल्याने देखील राज्यात आज (दि.२९) रोजी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

English Summary: 96 percent of rain in the state and 94 percent in the country rain update in india
Published on: 30 September 2023, 11:46 IST