Success Stories

मराठवाड्यातील परभणीच्या उच्चशिक्षित तरुणीने नोकरी न करता गावात नेदरलॅंडची मिरचीचे पिक घेऊन गावातील महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तिच्या या प्रयोगाची चर्चा गावातच नाहीतर परभणी जिल्ह्यात झाली.

Updated on 30 April, 2022 11:37 AM IST

मराठवाड्यातील परभणीच्या तरुणीने नेदरलॅंडची मिरचीचे पिक घेऊन गावातील महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तिच्या या प्रयोगाची चर्चा गावातच नाहीतर परभणी जिल्ह्यात झाली. कारण सध्या तरुण पिढी शेती व्यवसाय न करता त्यांचे स्वप्न असतं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून शहरात जाऊन नोकरी करणे. पण मार्च २०२० मध्ये जेव्हा कोरोनाची लाट आली आणि अनेक तरुण तरुणींच्या या स्वप्नांचा चुराडा झाला. अनेकांना शहर सोडून गावी परत यावे लागले. कोरोनाच्या काळात नोकरी मिळवणं तर सोडाच पण आहे त्यांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. अशा तरुण-तरुणींपैकी वैष्णवी देशपांडे देखील एक होती. वैष्णवीला देखील एम. ए. इतिहास झाल्यावर पीएचडी करून कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून अनुभव घ्यावा असं वाटत होतं. पण लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ बंद पडले. अशावेळी घरात बसून राहण्यापेक्षा स्वतःच काहीतरी सुरू करावं, असं वैष्णवीला वाटत होतं.

त्यानंतर तिने शेती करण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या कामाचा श्रीगणेशा करत, रासायनिक खतांमुळे आरोग्य धोक्यात येऊ शकतं, अशावेळी सेंद्रीय शेती ही वरदान ठरू शकते असा विश्वास मनात बाळगून वैष्णवीने आपल्या गावातच पॉलीहाऊस टाकून सेंद्रीय शेती करण्यास सुरुवात केली आहे. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील शेलगावमध्ये वैष्णवीच्या वडिलांची सहा एकर शेती आहे. येथेच वैष्णवीने १० गुंठ्यामध्ये पॉलीहाऊस उभं केलं आहे. सध्या वैष्णवी स्वतःच्या पायावर उभी असलेली एक शेतकरी असली तरी हा प्रवास सोपा नव्हता, असं ती सांगते. अतिशय मेहनत घेऊन व अडचणींचा सामना करून तिने पॉलीहाऊस उभं केलं आहे. नियंत्रित तापमान आणि हवामानात पीक घेण्यासाठी पॉलीहाऊस गरजेचे असते. शेती करताना महागाचं बी-बियाणं घेऊन व इतर मशागत करून शेती करावी लागते व या पिकला अवकाळी पाऊस किंवा दुष्काळाचा फटका बसू शकतो.

अशा वेळी हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ शकतो. पण पॉलीहाऊसच्या नियंत्रित वातावरणात पीक एकदम सुरक्षित राहतं. जेव्हा काढायचं तेव्हा काढता येऊ शकतं. या गोष्टींचा विचार करून वैष्णवीने पॉलीहाऊस तयार करण्याचा निर्णय घेतला. कोरोना काळात लॉकडाऊन शिथील झाल्यावर वैष्णवी तिच्या भावाकडे लोणावळ्याला गेली. भावाने पॉलीहाऊस उभारून लेट्युस, शिमला मिर्ची आणि ब्रोकोली अशा भाज्यांचं उत्पादन घेतेले असल्याचे तिने पहिले यावेळी तिने असे उत्पन्न गावाकडे काढता येऊ शकते का याबाबत तिने भावाशी चर्चा करून हे उत्पन्न गावाकडे काढण्याचा निर्णय घेतला.  मग गावी आल्यावर तिने सर्व गोष्टींची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली.

 तिची मेहनत पाहून तिच्या वडिलांनी पॉलीहाऊस उभारण्याचे ठरवलं व 10 गुंठ्यावर पॉलीहाऊस उभं केलं. येथील सर्व काम महिलाच करतात. गावातल्या महिलांना वैष्णवीने याबाबत गावातील महिलांशी चर्चा करून योजना कळवली व महिलांनीही तिला मदत केली. पहिल्यांदा वैष्णवीने शिमला मिरचीचं पीक घ्यायचं ठरवलं. नेदरलॅंडहून मागवलेलं बियाणे वापरून तिने शिमला मिरचीचं पीक घेतलं. महिलांना रोजगार उपलब्ध झाला.  "सेंद्रीय खत घेऊन शेती केल्यास आपल्याला विषमुक्त भाज्या आणि फळं मिळू शकतात. या भाज्या रासायनिक खतांचा वापर करून घेतलेल्या भाज्यांपेक्षा चविष्ठही व आरोग्यदायी देखील असतात.

रासायनिक खतांचा वापर न करता पीक घेतल्यास ते सर्वांच्याच फायद्याचं ठरू शकतं असा विश्वास वैष्णवीला आहे.  पाला पाचोळा, जनावरांचे खत याचा वापर तिने सिमला मिरचीला केले असल्याचे ती सांगते. यामुळे खर्चात बचत झाली कारण रासायनिक खते खूप महाग असून आरोग्यदायी नसल्याचे ती सांगते ही नेदरलॅंडची मिरची पिवळी आहे. त्यामुळे लोकांना वाटते मिरची पिवळी पडली. आम्ही त्यांना सांगतो तिचा रंगच पिवळा आहे तरीदेखील लोक ती घेत नाहीत. आम्ही हिरव्या मिरच्या सोबत या मिरच्या भेट दिल्याचे वैष्णवीने सांगितल. ही व्यवसायाची सुरवात आहे अजून खूप पुढे जायचे आहे असे वैष्णवी सांगते.

महत्वाच्या बातम्या
हटके बिझनेस आयडिया: पेट्रोल आणि डिझेलचा ऑनलाईन विक्री व्यवसाय करा सुरु, येथे वाचा सविस्तर माहिती
'किसान भागीदारी, प्राथमिकता हमारी', केंद्र सरकारचा उपक्रम शेतकऱ्यांच्या दारी, शेतकऱ्यांना फायदा..

English Summary: Young women by providing employment to the women of the village by cultivating chillies
Published on: 30 April 2022, 11:36 IST