देशातील अनेक युवक उच्च शिक्षण घेतात, आणि सरकारी किंवा गैरसरकारी विभागात नोकरी करण्याचे स्वप्न पाहतात. तसेच युवकांची इच्छा असते की त्यांना त्यांच्या कॉलिफिकेशन नुसार सॅलरी मिळावी. असच स्वप्न उराशी बाळगून अनेक युवक शिक्षणासाठी मेहनत घेत असतात. असेच स्वप्न उत्तर प्रदेश मधील मेरठ जिल्ह्यात राहणारे अजय त्यागी यांनी देखील बघितले होते. अजय त्यागी यांचे स्वप्न हे पूर्ण देखील झाले, त्यांनी एमसीए केल्यानंतर गुरूग्रामच्या एका मल्टिनॅशनल कंपनीत जवळपास पंधरा वर्षे नोकरी देखील केली.
त्यांनी त्यांच्या कार्यात कठोर परिश्रम घेतले आणि चांगले यश देतील संपादन केले, मात्र नोकरी करताना त्यांना आत्मीय समाधान प्राप्त होत नव्हते. अजय यांचा परिवार शेती करत होता, नोकरी करतांना अजय यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत होते, शहरात त्यांना शुद्ध वातावरण मिळत नव्हते. एवढेच नव्हे तर त्यांना चांगले भोजन देखील मिळत नव्हते. काबाडकष्ट करून देखील त्यांच्या जीवनात अनेक संकटे येत होती, त्यामुळे अजयने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि आपल्या गावाकडे शेती करण्यासाठी आगेकूच केली.
अजयने घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांच्या परीवाराला एक धक्काच बसला होता. यासाठी घरच्यांनी थोडा विरोध केला, मात्र अजय ने त्याला न जुमानता 2015 मध्ये शेती करण्याचा निर्णय घेतला. अजय ने सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली. डीडी किसान या वाहिनीनुसार अजय आपल्या शेतात सेंद्रिय पद्धतीने अनेक हंगामी भाजीपालाचे उत्पादन घेतात. तसेच ते आपल्या शेतात अनेक मसाला पदार्थ देखील पिकवितात. अजय आपल्या शेतात उगवल्या गेलेल्या भाजीपाल्यांचे आणि मसाला पदार्थांचे प्रोसेसिंग करून नवीन प्रॉडक्ट्स तयार करून बाजारात विक्री करतात. या कामात अजयला त्यांचे बंधू मदत करतात.
अजय मल्टी लेअर फार्मिंग ही टेक्निक वापरून आपल्या शेतात सेंद्रिय पद्धतीने भाजीपाल्याचे उत्पादन घेतात, प्राप्त झालेल्या भाजीपाल्यापासून अजय जवळपास 60 प्रकारचे प्रोडक्ट्स बनवतात. आणि यातून चांगली मोठे कमाई करतात. अजयच्या मते, मल्टीलेअर फार्मिंग मध्ये नुकसानीचा धोका कमी असतो जर एक पीक खराब झाले तर दुसरे पीक त्याची भरपाई करून देते असे अजय सांगतात. अजय डिमांडमध्ये असलेल्या पिकाची शेती करतात, त्यांनी त्यांच्या परिसरात डिमांडमध्ये असलेल्या काळा तांदळाची शेती सुरू केली आहे आणि ते साडेतीनशे रुपये प्रति किलो काळा तांदूळ विकतात. अजय त्यांच्या परिसरातील अनेक युवकांसाठी एक प्रेरणास्रोत आहेत, त्यांच्या परिसरातील अनेक युवकांना अजय स्वतः मार्गदर्शन देखील करतात.
Published on: 27 December 2021, 11:24 IST