जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर पिकाचे शेतकरी पारंपरिक पद्घतीने उत्पन्न घेतात. यवतमाळ जिल्हा कापसासाठी जसा प्रसिद्घ आहे. तसाच तो नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होणार्या आत्महत्यांनी काळवंडला आहे.या जिल्ह्यातील एका बहाद्दर शेतकर्याने पारंपरिक शेतीला फाटा देत चक्क नाशीकप्रमाणेच द्राक्षशेती फुलविली आहे.
उमशे झाडे, असे द्राक्षशेती फुलविणार्या युवा शेतकर्याचे नाव असून, तो राळेगाव तालुक्यातील वाढोणाबाजार येथील रहिवासी आहे. उमेशकडे आठ एकर शेती आहे. तोदेखील इतरांप्रमाणेच पारंपरिक कापूस व सोयाबीन पीक घेत होता. उत्पन्नाच्या तुलनेत बाजारपेठेत मालाला भाव मिळत नसल्याने शेती तोट्याची ठरत होती.
तोट्यात असलेल्या शेतीला नफ्यात आणण्यासाठी उमेश याने द्राक्षशेती करण्याचा निर्णय घेतला. द्राक्षाचे उत्पादन नाशिक, सोलापूर जिल्ह्यात घेतले जाते. विदर्भातसह यवतमाळ जिल्ह्यात द्राक्षशेती करण्याची हिमंत शेतकरी करीत नाही. त्यासाठी कारणही तसेच आहे, द्राक्षशेतीला येणारा खर्च सामान्य शेतकर्याच्या अवाक्याबाहेर जाणारा आहे. असे असतानाही यवतमाळ जिल्ह्यातील वाढोणाबाजार येथील शेतकर्याने मोठ्या हिमतीने सव्वा एकर शेतात द्राक्ष बाग लावली. त्यासाठी जवळपास आठ लाख रुपयांचा खर्च केला.
द्राक्षबाग आपल्याकडे होत नाही. खर्च पाण्यात जाईल, असे म्हणून युवा शेतकर्याला वेड्यात काढले.
परंतु, त्याने जिद्द व कष्टाने दीड हजार द्राक्षांची झाडे जगविली. उत्पन्नाला सुरुवात झाली असून, पहिल्या वर्षी कमी नफा मिळाला. पुढील वर्षी दोनशे टन द्राक्ष निघण्याची अपेक्षा असून, त्यातून दहा लाखापर्यंत उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे. द्राक्षशेतीचा नाशिक पॅटर्न आगामी काळात जिल्ह्यातील शेतकर्यांनी अवलंबल्यास शेतकर्यांचा जीवनात आर्थिक समृद्घी आल्याशिवाय राहणार नाही. शेतकर्यांना खर्चाच्या तुलनेत उत्पन्न होत नाही. एखाद्या वर्षी उत्पन्न झाल्यास भाव मिळत नाही. माझ्या मित्राने सव्वा एकरात द्राक्ष लागवड केली आहे. पारंपारिक शेतीला त्याने फाटा दिला. त्याला विरोध झाला. तरीही त्याला न जुमानता द्राक्ष शेती केली.
यवतमाळ जिल्ह्यात द्राक्ष शेती होऊ शकते, हे त्याने दाखवून दिले. कष्ट आणि जिद्दीच्या भरोवशावर शक्य झाले आहे.आपल्याकडे द्राक्षशेती केली जात नाही. संत्रा, मोसंबी, निंबू फळबागा आहेत. आठ लाख रुपयाचा खर्च शेतकर्याला द्राक्षशेतीसाठी आला. पुढील वर्षी दहा लाख रुपयाचे उत्पन्न येण्याची अपेक्षा आहे. द्राक्षशेतीमुळे नाशिकमधील शेतकरी श्रीमंत आहे. शेतकर्यांनी मेहनत व जिद्दीने फळबाग लावल्यास आयुष्यात कायापालट होऊ शकतो. यंदा नफा कमी मिळाला. पुढील वर्षी दोनशे टन द्राक्ष निघण्याची अपेक्षा आहे. दीड हजार झाडे असून, त्यातून दहा लाखांचे उत्पन्न होऊ शकते. शेतकर्यांनी पारंपारिक शेती न करता द्राक्ष शेती केल्यास चांगला नफा मिळू शकतो.
Published on: 15 May 2022, 02:49 IST