भारतात अनेक युवा आपल्या बुद्धी आणि मेहनतीच्या जीवावर आपले नाव गाजवत असतात. आणि ह्या युवकांची कहाणी अनेकांसाठी खुपच प्रेरणादायी ठरते. आज आम्ही घेऊन आलो आहोत अशाच एका युवा शेतकऱ्यांची रोचक कहाणी, मध्यप्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील एका अवलिया शेतकऱ्याची कहाणी.
कोण आहे हा अवलिया शेतकरी आणि का आहे एवढ्या चर्चेत
एकेकाळी भंगाराचे काम करणारा, 12वी फेल विनोद आता चक्क कडकनाथ कोंबडीचा (kadknath kombadi) व्यापार करतो. विनोद मेडा हा कडकनाथ कोंबडीचा एक कोंबडी फॉर्म चालवतो. विनोद हा आपल्या क्रिकेट टीमचे मेंटर व भूतपूर्व यशस्वी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (mahendra singh dhoni) यांना देखील कडकनाथ कोंबडीचे पिल्ले सप्लाय करतो. गतवर्षी धोनीने झाबुआच्या ह्या शेतकऱ्याकडून 2000 कडकनाथची पिल्ले मागवली होती. आणि आता परत धोनीच्या मॅनेजरने फोन करून विनोदला कडकनाथच्या पिल्लांची ऑर्डर दिली आहे. विनोद हा मागच्या वेळी धोनीला भेटू शकला नाही पण त्याची ह्यावेळेस धोनीला भेटण्याची इच्छा आहे.
खूपच रंजक आहे ह्या अवलिया शेतकरीची कहाणी
कॅप्टन कूलला कडकनाथ कोंबडीची सप्लाय करून चर्चेत आलेल्या ह्या युवकांची कहाणी अतिशय रंजक आहे. विनोद मेडा हा झाबुआच्या थांडला परिसरातील रहिवासी आहे. त्याचे वडील अपंग होते आणि ते मजूर म्हणून काम करत होते. वडिलांना पाहून विनोदनेही मजुरी सुरू केली. बारावी नापास विनोदने 2014 मध्ये गुजरातच्या भरूचमध्ये स्क्रॅपचे, भंगारचे काम सुरू केले. रोज अथत परिश्रम घेऊन विनोद महिन्याकाठी जेमतेम 10000 रुपये कमवत होता आणि आपला व परिवाराचा उदरनिर्वाह कसाबसा चालवीत होता जवळपास दोन वर्ष त्याने हे काम केले.
दोन वर्षाच्या कठीण परिश्रमातून विनोदने जवळपास एक लाख रुपये कसे बसे वाचवले आणि आपल्या घराच्या दुरुस्तीसाठी तो गावी परतला. घराचे काम सुरु केले पण एक लाखात घराचे काम काही होऊ शकले नाही त्यामुळे विनोद हताश झाला, आणि रात्रींनंतर सकाळ होतेच तसंच काहीस झालं विनोदला कोणीतरी कोंबडीपालणाचा सल्ला दिला. घराच्या कामासाठी ज्या विटा व सिमेंट उरलेले होते त्यातूनच त्याने फॉर्म बांधायचं ठरवलं, काही दिवसांनी शासनाकडे कोंबडीपालणासाठी कर्जाचा अर्ज केला आणि सुदैवाने तो पारित झाला आणि विनोदला पाच लाख रुपयाचा निधी मंजूर झाला.
त्यातूनच त्याने राहिलेले फॉर्मचे काम केले. विनोदने त्यानंन्तर कोंबडीपालनाविषयीं माहिती मिळवली, माहिती मिळवल्यानंतर विनोद पिल्ले तयार करण्याचे मशीन घेण्यासाठी एणारकुलमला गेला. वापस येऊन दुसऱ्या एका फॉर्मवरून कोंबडीचे अंडे आणले आणि मशीनपासून पिल्ले तयार केले. त्यानंतर मात्र विनोदने आपल्याच कोंबडीपासून अंड्याचे उत्पादन सुरु केले. आज विनोदजवळ जवळपास 3500-4000 कोंबडावेळ व कोंबडी उपलब्ध आहेत.
विनोदने आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी सोशियल मीडियाचा फायदा घेतला. विनोदचा आशिष कोंबडी फॉर्म हा फेसबुक व युट्यूबवर आहे. त्यातूनच धोनीच्या मॅनेजरने विनोदशी संपर्क साधला आणि कडकनाथ कोंबडीची ऑर्डर दिली.
Published on: 16 September 2021, 08:12 IST