Success Stories

कमी पाऊस आणि प्रदेशातील अपुऱ्या सिंचन व्यवस्थेमुळे, गावातील इतर कुटुंबांप्रमाणेच तिलाही जगणे अशक्य झाले होते.. पोटाची खळगी भरायची कशी ? या चिंतेने निराश झालेल्या लातूरच्या शोभा गव्हाणे सततच्या दुष्काळाने कंटाळल्या होत्या. कुटुंबातील सदस्यांना कमीतकमी उत्पन्न मिळवून देण्यासाठी शेतीसह त्या इतर पर्यायांचा शोध घेत होत्या. गेल्या काही वर्षांत या प्रदेशातील दुष्काळाची वारंवारता वाढली होती आणि त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली होती. अशा परिस्थितीत जीवनाच्या पर्यायाचा शोध घेणे सुरु होते.

Updated on 13 March, 2020 3:53 PM IST


कमी पाऊस आणि प्रदेशातील अपुऱ्या सिंचन व्यवस्थेमुळे, गावातील इतर कुटुंबांप्रमाणेच तिलाही जगणे अशक्य झाले होते.. पोटाची खळगी भरायची कशी ? या चिंतेने निराश झालेल्या लातूरच्या शोभा गव्हाणे सततच्या दुष्काळाने कंटाळल्या होत्या. कुटुंबातील सदस्यांना कमीतकमी उत्पन्न मिळवून देण्यासाठी शेतीसह त्या इतर पर्यायांचा शोध घेत होत्या. गेल्या काही वर्षांत या प्रदेशातील दुष्काळाची वारंवारता वाढली होती आणि त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली होती. अशा परिस्थितीत जीवनाच्या पर्यायाचा शोध घेणे सुरु होते.

याच वेळी शोभाला नियमित उत्पन्न मिळवून देणाऱ्या आणि शेतीच्या पद्धतीत बदल घडवून आणणाऱ्या प्रधानमंत्री कौशल्य विकार योजना (पीएमकेव्हीवाय) ची माहिती समजली. दुष्काळासारख्या परिस्थितीवर मात करण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या या पर्यायांचा शोध सुरू असतेवेळीच विशेष कृषी प्रकल्प  असलेल्या “छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियान” ची ती सदस्य झाली. शोभा आणि तिच्या टीमने या प्रकल्पाच्या अंतर्गत गट शेती प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केले. त्यानंतर लगेचच ती या प्रशिक्षण कार्यक्रमाचा एक भाग बनली. 

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (पीएमकेव्हीवाय) ही कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाची (एमएसडीई) प्रमुख योजना आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा एक भाग होण्यासाठी तिने आपल्या समवयस्कांना एकत्र केले, विचारपूर्वक निवडलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत गट शेतीच्या फायद्याची त्यांना  जाणीवही झाली. आणि प्रशिक्षण शिबिरात दिलेले मार्गदर्शनानुसार शेती सुरू झाली. सामुहिक प्रयत्नातून आर्थिक वाढीच्या संभाव्य संधींचा शोध घेण्यासाठी ग्रुप फार्मिंग प्रॅक्टिशनर म्हणून प्रमाणित झाल्यानंतर त्यांनी एक शेतकरी गट स्थापन केला. सर्वांना घरगुती कुक्कुटपालनाचे व्यवस्थापनाचा अनुभव होताच त्याच्या सोबत ग्रुप फार्मिंग प्रशिक्षणाने “साक्षीदेवी शेतकरी उत्पादक कंपनी” (लातूर) अंतर्गत कुक्कुटपालनाचा व्यवसाय करण्याचा निर्णय या गटाने घेतला. या गटाला त्यांच्या प्रस्तावित पोल्ट्री व्यवसायासाठी “अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास विकास महामंडळ मेरीडिट” कडून पूर्व-मंजूर कर्ज देखील मिळाले. आजमितीला त्यांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. 

शोभा प्रमाणेच इतर खेडेगावातील इतर स्त्रियांही शेतीपलीकडच्या अशा पद्धतीच्या व्यवसायाच्या संधी शोधत आहेत. कालांतराने, शोभा शिराळा येथील शेती समुदायाची सक्रिय सदस्य बनली. इतर महिला शेतकरी आणि त्यांच्या संस्थांसोबत काम करण्यास तिने सुरवात केली आणि त्यांना सेंद्रिय शेती कार्यात गुंतवणूक करण्यासाठी संवेदनशील केले. शिराळा येथील एक सक्रिय शेतकरी आणि महिला शेतकर्‍यांची नेता या नात्याने त्यांनी गट शेतीच्या प्रशिक्षणाबद्दल प्रशिक्षण घेण्यासाठी आणि या प्रशिक्षण कार्यक्रमात अधिकाधिक सहभागी होण्यासाठी, मंडळ समन्वयकांकडे संपर्क साधला आणि आपल्यासोबतच गावातील १२ महिलांची यात भरतीही केली.


गट शेती प्रशिक्षण

शिराळा येथील मधील बहुतेक स्त्रिया लहान जमीनदार आहेत, कुटूंब आणि पिढ्यांद्वारे जमीन विभागल्यामुळे त्यांना एका गटाची शक्ती समजली आहे. सदय स्थितीत या महिलांचे बचतगटच नव्हे तर 20 लहान जमीनदार महिलांचे तीन शेतकरी गटही शिराळ्यामध्ये कार्यरत आहेत. गटात त्यांचा सहभाग असूनही, प्रत्येक स्त्री त्यांची वैयक्तिक पिके घेत होती. एकाच उद्दीष्टाने एकत्र काम केले तर त्यांना अधिक चांगले फायदे मिळू शकतील ही बाब त्यांना आगाऊ प्रशिक्षण कार्यक्रमाने समजली आहे. या समजूतदारपणामुळे आणि त्यांच्या गटात काम करण्याच्या अनुभवाने शिराळा येथील महिला शेतकर्‍यांनी पॅलेडियम इंडियाच्या बिझिनेस अ‍ॅडव्हायझरी सर्व्हिसेस (बीएएस) चमूला भेट दिली. त्यांनी हे प्रशिक्षण पुढच्या टप्प्यावर घेऊन जाण्यास या गटाला मदत केली. इतकेच नव्हे तर शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीसी) बनविण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले.

बीएएस कार्यसंघाने त्यांच्या कृषी कौशल्यांवर आणि शेतीच्या अनुभवावर आधारित शॉर्टलिस्टिंग व्यवसायातील कामांमध्ये त्यांना मदत केली. त्यानंतर शेतकर्‍यांच्या गटाने व्यवसाय क्रिया म्हणून पोल्ट्रीसह पुढे जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागील महत्त्वाचे कारण म्हणजे बहुतेक सदस्यांना घरगुती कुक्कुटपालन व्यवस्थापनाचा अनुभव होता. गट अनुभवाचे प्रशिक्षण आणि बीएएस संघाशी सल्लामसलत अशा अनुभवामुळे पोल्ट्री व्यवसाय व्यवस्थापित करण्यास सक्षम असल्याचा त्यांचा आत्मविश्वास वाढला. शिवाय, शोभाच्या मदतीने, बीएएस टीमने पोल्ट्रीवर विचार करण्याच्या उद्देशाने चर्चा आणि बैठकी आयोजित केल्या आणि व्यवसायिक योजनेत भाषांतरित करण्याची तयारीही त्यांनी सुरू केली.

एफपीसी तयार करण्यासाठी, प्रशिक्षणार्थी शेतकर्‍यांनी शिराळा येथील कार्यरत महिलांची यादी तयार केली आहे. जे या गटात इच्छुक भागधारक आहेत त्यांनी एफपीसीची कागदपत्रे आणि नोंदणी पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी शोभा गव्हाणे यांनी या प्रशिक्षित सदस्यांना एकत्र केले आहे. महामंडळाकडून आर्थिक मदत मिळविण्यासाठी व कर्जाची रक्कम मंजूर होण्यापूर्वी गटाच्या सदस्यांना कंपनीच्या खात्यात 1 लाख रुपयांची शिल्लक राखणे आवश्यक असते इतकी एकच अट ठेवण्यात आली आहे.

बॉबी निंबाळकर
कार्यकारी उपाध्यक्ष, एसआयएमईसीईएस लर्निंग एलएलपी
(एसआयआयएलसी), पुणे

English Summary: Women empowerment can be achieved through agricultural training programs
Published on: 13 March 2020, 03:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)