शेतीमध्ये सध्या अनेक प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान आले आहे. यामुळे यामध्ये मोठे बदल झाल्याचे आपल्याला बघायला मिळत आहेत. असे असताना आता इंदापूरच्या पांढऱ्या जांभळाची सध्या चर्चा सुरु आहे. या जांभळाला सध्या ४०० रुपये प्रतिकिलो असा भाव देखील मिळत आहे. आतापर्यंत आपण जांभळ्या आणि काळ्या रंगाचे जांभूळ बघितले आहे.
असे असताना पांढऱ्या रंगाच्या जांभळाची चर्चा सध्या सुरु आहे. भारत लाळगे यांनी एक एकरावर पांढऱ्या रंगाच्या जांभळाची लागवड केली. पांढऱ्या रंगाच्या जांभूळ पिकाची लागवड करणारे भारत लाळगे हे राज्यातील पहिले शेतकरी आहेत. यामुळे त्यांची ही शेती बघण्यासाठी अनेकजण त्याठिकाणी भेट देत आहेत.
हे जांभूळ बोरासारखे दिसत आहे. 1 एकर जमिनीवर पांढऱ्या रंगाच्या जांभळाची लागवड भारत लाळगे यांनी केली. एकरी 302 रोपांची लागवड लाळगे यांनी केली आहे. याआधी भारत लाळगे डाळिंब आणि पेरु या पिकाची लागवड करत होते. आता त्यांनी जांभूळ शेती यशस्वी केली आहे. 2019 साली पेरुच्या पिकात त्यांनी पांढऱ्या रंगाच्या जांभळाची आंतरपीक म्हणून लागवड केली होती.
कमी खर्चात जांभळाचे पीक घेतले जाते. सध्या जांभळाची हार्वेस्टिंग सुरु आहे. ज्याची मार्केटला किंमत 400 रुपये प्रतिकिलो इतकी आहे. यामुळे त्यांना चांगले उत्पादन मिळणार आहे. पांढऱ्या रंगाच्या जांभळात विविध औषधी गुण आहेत. यामुळे याची मागणी देखील जास्त आहे. आगोदर अनेक ठिकाणी जांभळाची झाडे होती, मात्र सध्या ती कमी झाल्याने त्याची मागणी वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या;
248 एकर जमीन, एकराचा भाव २ कोटी तरी यशवंत बंद पडलाच कसा? वाचा खरी परिस्थिती..
कृषी पदवीधरांची ५० वर्षांनी जमली गट्टी; अनेक विद्यार्थी यशस्वी उद्योजक
शेतकरी राजांनो खरिप हंगामातील पीककर्जाची प्रक्रिया सुरु, असा घ्या लाभ, जाणून घ्या सर्वकाही..
Published on: 26 April 2022, 04:56 IST