Success Stories

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रसायनमुक्त शेतीला जे प्रोत्साहन दिले होते त्यास आता यश मिळू लागले आहे. या उपक्रमामध्ये तरुण वर्गाचा चांगलाच समावेश आहे. काळाच्या ओघानुसार तरुण वर्ग रोगांपासून बचाव करण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे आपला कल ओळवत आहेत. सतना जिल्ह्यातील संजय शर्मा, हिमांशू चतुर्वेदी आणि अभिनव तिवारी या तीन व्यक्तींच्या प्रयत्नातून 'कामधेनू कृषक कल्याण समिती'च्या माध्यमातून स्थानिक जैतवाडा-बिरसिंगपूर रस्त्यावर मॉडेल सेंद्रिय शेती विकसित केली जात आहे. या संस्थेद्वारे नैसर्गिक आणि गाईवर आधारित शेती कशी करायची याचे कौशल्य दिले जात आहे.

Updated on 22 February, 2022 12:50 PM IST

अशा प्रकारे नवीन मिशनची सुरुवात झाली :-

हिमांशू चतुर्वेदी हा व्यक्ती फार्मा कंपनीमध्ये काम करत आहे. हिमांशू याने सरकारी योजनांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचा उपक्रम चालू केला आहे. तो फार्मा कंपनीमध्ये काम करत असताना त्यांच्या लक्षात आले की मागील अनेक वर्षांपासून (कॅन्सर, शुगर, ब्लडप्रेशर सारख्या अनेक रोगांच्या समस्या वाढत निघाल्या आहेत जे की याच मूळ कारण काय आहे हे त्याच्या लक्षात आले. लोकांना आजारांवर औषधे खरेदी करण्यापेक्षा त्यांना चांगल्या प्रकारे अन्न च देऊ असा विचार हिमांशू ने केला.

संजय शर्मा, हिमांशू चतुर्वेदी आणि अभिनव तिवारी हे तिघेही सरस्वती शिशु मंदिर, कृष्णा नगर या शाळेत शिकले आहेत. त्यामधील एक जण पश्चिम मध्य रेल्वेमध्ये ट्रेन मॅनेजर आहे तर दुसरा मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काम करतो तसेच तिसरा आहे तो बीएसएनएल मध्ये एसडीओ आहे. हे तिघे जण नोकरी करत करत आपल्या पूर्वज लोकांची ओळख तसेकंब समाज बदलण्याच्या दृष्टिकोनातून कामातून राहिलेला जो वेळ आहे तो सेंद्रिय शेती आणि शेतकरी उन्नत करण्यात घालवत आहेत. एका वर्षात लगेच कोणतीच शेती सेंद्रिय शेती म्हणून करता येत नाही तर त्यादठी अनेक वर्षे प्रयत्न करावे लागतात. सेंद्रिय शेती करण्यास चालू केले की रसायनांचा वापर हळूहळू कमी करावा लागतो आणि शेणखत घालावे लागते.

सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण मोफत देते :-

मागील दोन वर्षांमध्ये कोरोना चे लॉकडाउन पडले जे की त्या काळात तिघे मित्रांनी वेळेचा सदुपयोग करून सेंद्रिय शेती करण्यास चालू केले आणि स्थानिक पातळीवर आपली ओळख निर्माण केली. सुरुवातीस या तीन मित्रांनी बगाहा येथील केशव माधव गोशाळेमधून सेंद्रिय शेती करण्यास चालू केले. आता तेच काम बमुर्‍हामध्ये मोठ्या प्रमाणावर करत आहेत. हळद, कांदा, बटाटा, धेंचा, शेवया कंपोस्ट, गांडुळे, सेंद्रिय भाजीपाला इत्यादी अनेक सेंद्रिय उत्पादनांची विक्री करण्याबरोबरच वेळोवेळी मोफत प्रशिक्षणही त्या ठिकाणी दिले जाते.सतना येथे असलेल्या फलोत्पादन विभागामार्फत, या तीन मित्रांनी अनेक योजनांचा लाभ घेतला आहे, ज्यामध्ये सुधारित बियाणे, झाडे, वर्मी कंपोस्ट युनिट आणि सिंचनासाठी स्प्रिंकलर प्रमुख आहेत. माझ गव्हाण येथील केव्हीके देखील सेंद्रिय शेती आणि शेतकऱ्यांच्या जागृतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

English Summary: While working, the three friends started doing organic farming, taking training from local farmers
Published on: 22 February 2022, 12:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)