Success Stories

शेतीला पाण्याचा पुरवठा योग्य वेळी होणे हे पीक चांगले येण्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहे. परंतु बऱ्याचदा होते असे की, जेव्हा शेतामध्ये पिकांना पाण्याची नितांत गरज असते तेव्हाच पिकांना बर्याच कारणांमुळे पाण्याचा योग्य पुरवठा होऊ शकत नाही.

Updated on 07 April, 2022 8:42 AM IST

शेतीला पाण्याचा पुरवठा योग्य वेळी होणे हे पीक चांगले येण्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहे. परंतु बऱ्याचदा होते असे की, जेव्हा शेतामध्ये पिकांना पाण्याची नितांत गरज असते तेव्हाच  पिकांना बर्‍याच कारणांमुळे पाण्याचा योग्य पुरवठा होऊ शकत नाही.

यामध्ये विजेचा लपंडाव हा तर पाचवीलाच पुजलेला असतो. त्यातही वरून लोडशेडिंग कधीकधी दाब जास्त झाल्याने ट्रांसफार्मर जळतात व ऐन वेळेस पिके जळायची पाळी येते. परंतु कुठल्याही प्रकारचे इंधन किंवा वीज न वापरता शेतांना पाणी देण्याची पद्धत किंवा व्यवस्था राहिली तर किती बरे होईल असे आपल्याला वाटते. परंतु डोक्यातील हीच कल्पना शेतकऱ्यानी सत्यात उतरवून दाखवले आहे. याबद्दल या लेखात आपण सविस्तर जाणून घेऊ.

नक्की वाचा:लेकीचे जन्मानंतर हेलिकॉप्टरने ग्रँड वेलकम! लेकीच्या जन्मानंतर असही स्वागत, खरच अभिमान वाटावा असेच

 80 एकर क्षेत्र आणि वीज इंधना  शिवाय पाण्याचा पुरवठा

 छत्तीसगड राज्यातील सुकमा या जिल्ह्यातील शेतकरी गिरडलपारा उपसा  सिंचन प्रकल्पाच्या मदतीने कुठल्याही प्रकारचे इंधन आणि विजेचा वापर न करता ऐंशी एकर जमिनीवर सिंचन करता आहेत व त्या माध्यमातून चांगले पिकांचे उत्पादन घेत आहेत व चांगला नफा देखील कमवीत आहेत.

हे शेतकरी भातच नाही तर इतर वेगळ्या प्रकारची पिके देखील घेत आहे. यासंदर्भात परदेशी राम या शेतकऱ्याने सांगितले की, या उपसा सिंचन प्रकल्पाच्या मदतीने शेतातून दुबार पिके घेता आली व त्याचा फायदा झाला. असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. यापूर्वी त्यांच्या शेतामध्ये फारच मर्यादित क्षेत्रामध्ये पिके घेणे शक्‍य होते. त्यांनी सांगितले की अगदी पावसाळ्यामध्ये सुद्धा पीक चांगले येत नव्हते. परंतु आता उपसा सिंचन पद्धतीच्या चांगल्या वापराने शेतांना पाण्याची व्यवस्था उभी राहून भाजीपाला सारखे आहे पिके घेऊन चांगला नफा मिळत आहे.

 सुकमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे कौतुकास्पद कार्य

 या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनीत नंदनवार यांना या सगळ्या कार्याचे श्रेय जाते.

नंदनवार यांनी शेतकऱ्यांच्या या संबंधीच्या समस्या जाणून घेतल्या व त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतींचा वापर कसा करता येईल याचा विचार केला व त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या. निव्वळ भात पिक घेणारे येथील शेतकरी आता कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नांमुळे यासोबतच जलसंपदा विभाग व फलोत्पादन विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे शेतकरी आता अनेक प्रकारचे पिके घेत असून चांगली कमाई करत आहे.

नक्की वाचा:प्रेरणादायी! सपाटा शिमला मिरची देत आहे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक दिशा, येथील शेतकरी कमवीत आहेत चांगला नफा

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हित कशात आहे याचा अभ्यास करून जिल्हाधिकारी विनीत नंदनवार यांनी उद्योगमंत्री कावासी लखमा यांच्या मार्गदर्शनाखाली उपसा सिंचन प्रकल्पाचे काम सुरू केले.ही यंत्रणा पूर्णतः इंधन आणि विजेशिवाय चालते. या गिरलपारा उपसा सिंचन प्रकल्प  पेट्रोल, डिझेल आणि रॉकेल या सारखे कुठल्याही प्रकारचे इंधन आणि वीज यांचा वापर केला जात नाही. 

उपसा यंत्रणा फक्त पाण्याच्या ऊर्जेने चालते. या प्रकल्पामध्ये पाणी साठवण्यासाठी दीड किलोमीटर अंतरावर पंचवीस पंचवीस मीटरच्या टाक्या उभारले असून त्यांची खोली 1.20 मीटर इतकी आहे. यामध्ये छोट्या चर किंवा नदी म्हणता येईल त्यांच्या साह्याने 24 तास पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे 80 एकर जमीन सिंचनाखाली आरामशीर आणता येते.

English Summary: water management of 80 acre farmland crop without elecrtricity and fuel
Published on: 07 April 2022, 08:42 IST