Success Stories

आजच्या काळात महिला कोणत्याच क्षेत्रात कोणाहीपेक्षा कमी नाहीत. कृषी क्षेत्रात देखील महिला नवनवीन प्रयोग अंमलात आणून आपले नाव गाजवीत आहेत. या महिला शेतकऱ्यांच्या कामाची दखल देखील घेतली जातं आहे यामुळे इतर महिलांना नक्कीच प्रेरणा मिळत आहे.

Updated on 28 March, 2022 10:09 PM IST

आजच्या काळात महिला कोणत्याच क्षेत्रात कोणाहीपेक्षा कमी नाहीत. कृषी क्षेत्रात देखील महिला नवनवीन प्रयोग अंमलात आणून आपले नाव गाजवीत आहेत. या महिला शेतकऱ्यांच्या कामाची दखल देखील घेतली जातं आहे यामुळे इतर महिलांना नक्कीच प्रेरणा मिळत आहे.

आज आपण अशाच एक प्रगतिशील महिला शेतकऱ्याविषयीं जाणून घेऊया. आज आपण राजस्‍थान राज्यातील एका महिला शेतकरी विषयी जाणुन घेऊया, जिने आपल्‍या मेहनतीच्‍या बळावर राज्‍यात नव्हे नव्हे तर संपूर्ण देशात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने शेतीमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल दोनदा वर्ष 2013 आणि वर्ष 2017 मध्‍ये राष्‍ट्रपती पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.

आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, सध्या राजस्थान राज्यातील महिला सरकारच्या मदतीने सुमारे 20 स्टार्टअप चालवीत शेती करत आहेत. या स्टार्ट अप मध्ये काम करणाऱ्या स्त्रिया सेंद्रिय शेती, दोन दुग्धव्यवसाय आणि 13 इतर कृषी आधारित उद्योग यशस्वीपणे चालवत आहेत, परंतु या महिलांपैकी एक महिला जिने केवळ 8 वी पर्यंत शिक्षण घेतले आहे तिचे नाव आहे संतोष पाचर. संतोष या राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील मौजे झिगर बडी येथे राहतात. आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे कि,  एकट्या संतोष या महिला शेतकऱ्याकडे 30 बिघा शेतजमिन आहे.

संतोष सांगतात की त्यांनी 2002 मध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी आपल्या शेतात गाजराची लागवड केली असता त्यांच्या लक्षात आले की बाजारातून घेतलेले बियाणे सदोष होते यामुळे उत्पादित झालेल्या गाजर खराब दर्जाचे प्राप्त झाले. त्यामुळे आपल्या पिकाचे उत्पादन सुधारण्यासाठी संतोषने स्वतःचे बियाणे तयार केले, जे पूर्णपणे नवीन तंत्रज्ञानाने विकसित केले गेले. 

संतोषची ही मेहनत फळास आली आणि परिणामी संतोषला पिकातून चांगले उत्पादन मिळू लागले. संतोष यांच्या या गाजरांचा गोडवा सुमारे 5 टक्के आणि उत्पादन कार्यक्षमता सुमारे 2 ते 3 पट वाढली. त्यांनी शेती क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल, प्रयत्नामुळे आणि यशामुळे संतोषला 3 लाख रुपयांचे बक्षीस आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले.

गाईच्या शेणापासून बनवलेला गॅस प्लांट

संतोष या महिला असूनही इथेच थांबल्या नाहित, तर त्यांनी शेणापासून घरात गोबर गॅस प्लांटही उभारला. त्यांच्या या कामाचा गावातील सुमारे 20 कुटुंबांना लाभ मिळाला.  इतकेच नाही तर संतोष तिच्या गावातील महिलांना शेतीच्या नवनवीन पद्धती सांगतात आणि त्यांना शेती करण्यासाठी मदत करतात.

बागकामाच्या प्रयत्नात यश

महिला शेतकरी संतोष यांनी फळबाग लागवडीतही यश मिळवले. खरे तर, संतोषच्या पतीला डाळिंबाची बाग लावण्याची कल्पना सुचली आणि त्यांनी ही कल्पना संतोष यांना सांगितली, तेव्हा संतोषने लगेचच होकार देत डाळिंब लागवडीस होकार दर्शवला. त्यांनी त्यांच्या शेतात डाळिंबाची रोपे लावली आणि डाळिंबाला तीन वर्षेनंतर फळे येऊ लागली.

डाळिंब लागवडीतून संतोषला खूप फायदा झाला त्यामुळे संतोष यांनी आपल्या शेतात लिंबू आणि पेरूची रोपे लावली, यातूनही त्यांना चांगला नफा मिळाला. संतोषला सध्या फळबागेतून वर्षाला सुमारे 25 ते 30 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. संतोष आपल्या गावातील बाकीच्या महिलांसाठी एक प्रेरणास्रोत बनले आहेत, यामुळे गावातील इतर महिलाही शेतीत रस दाखवत आहेत.

संबंधित बातम्या:-

युवा शेतकऱ्याचे कलिंगड दुबई रवाना! पाणीटंचाईवर मात करीत फुलवली कलिंगडची शेती

वावर है तो पॉवर है! विदेशातली नौकरी सोडून करतोय शेती, आज लाखोंची उलाढाल

English Summary: Uneducated women farmers receive two Presidential Awards for outstanding performance, read this unique success story
Published on: 28 March 2022, 10:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)