Success Story:- तुमच्याकडे किती क्षेत्र आहे याला महत्व नसून तुम्ही आहे त्या क्षेत्रामध्ये कशाप्रकारे शेती करतात याला खूप महत्त्व असते. सध्या तंत्रज्ञानाच्या मदतीने कमीत कमी क्षेत्रात देखील खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी उत्पादन घेऊ लागले आहेत. यामध्ये शेडनेट तंत्रज्ञानाचा वापर हा शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचा ठरताना दिसून येत आहे. यामध्ये तुम्हाला कुठलेही पीक कुठल्याही हंगामामध्ये घेणे देखील शक्य होते.
शेडनेट तंत्रज्ञानाचा जर व्यवस्थित वापर करून जर पिकांचे व्यवस्थापन केले तर भरघोस उत्पादन मिळते आणि मिळालेल्या उत्पादनाला जर बाजार भाव चांगला मिळाला तर 100% या माध्यमातून शेतकरी चांगल्या प्रकारे आर्थिक प्राप्ती करतात. याचेच एक उत्तम उदाहरण आपण या लेखात पाहणार असून यशोगाथा औरंगाबाद जिल्ह्यातील लाड सांगवी नावाच्या गावातील शेतकऱ्याची आहे.
मिरची आणि काकडी लागवडीतून कमावला पाच लाखापर्यंत नफा
जर आपण याबाबतचे सविस्तर वृत्त पाहिले तर औरंगाबाद जिल्ह्यातील लाडसांगवी या गावचे बंडू पाटील पडूळ या नावाच्या शेतकऱ्याने शेडनेट तंत्रज्ञानाचा वापर करून या शेडनेटमध्ये अर्ध्या एकरात काकडीची लागवड केली व अर्ध्या एकरामध्ये शिमला मिरची लागवड केलेली होती. परंतु या माध्यमातून त्यांनी दोन्ही पिकांचे भरघोस उत्पादन घेत सहा महिन्यांमध्ये काकडीतून साडेतीन लाख रुपये तर शिमला मिरची विक्रीतून दोन लाख 55 हजार रुपयांचा घसघशीत असा नफा मिळवला.
त्यांनी 20-20 गुंठ्याचे शेडनेट मध्ये अर्धा एकरात काकडी आणि दुसऱ्या अर्ध्या एकर मध्ये शिमला मिरचीची लागवड केली होती. सहा महिन्याच्या कालावधीमध्ये बाजारपेठेत काकडीला उत्तम भाव मिळाला आणि शेडनेट मुळे तापमान नियंत्रणात राहिल्याने काकडीचे फळ देखील दर्जेदार असे आले. याकरिता त्यांनी पिकाची काळजी देखील तितकीच घेतली.
आतापर्यंत त्यांनी 26 टन काकडीचे उत्पादन घेतले असून 22 रुपये किलो या दराने त्यांनी विकली आहे. एवढेच नाही तर या एक एकर वरील शेडनेट शिवाय त्यांच्याकडे 17 एकर जमिनीवर त्यांनी मोसंबी, डाळिंब आणि टरबुजाच्या फळांची लागवड देखील केली आहे. बंडू पाटील यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पिकांसाठी आवश्यक असणारे. जिवाणू खते बनवण्यापासून तर ड्रीप तसेच निर्जंतुकीकरण, बुरशीनाशके तसेच शेणखत इत्यादी सगळ्या गोष्टींची ते व्यवस्थित व्यवस्थापन आणि काळजी घेऊन नियोजन करतात.
शेडनेट तंत्रज्ञान आहे महत्त्वाचे
शेडनेट या प्रगत अशा तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर शेतकऱ्यांच्या खर्चात देखील खूप मोठ्या प्रमाणावर बचत होते. तंत्रज्ञानामध्ये जाळ्यां खालील परिस्थितीचे दुरुस्तपणे निरीक्षण आणि नियंत्रण करण्याच्या क्षमतेसह शेतकरी हे पाणी, खते आणि कीटकनाशके यांचे वापरण्याचे प्रमाण देखील कमी करू शकतात व त्यामुळे उत्पादन खर्चात खूप बचत होते. शेडनेट तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता देखील सुधारते. त्यामुळे या दृष्टिकोनातून शेडनेट तंत्रज्ञान खूप महत्वपूर्ण आहे.
Published on: 06 August 2023, 08:45 IST