पुण्यातील भोदणी येथील सत्यजित हंगे आणि अजिंक्य हंगे या दोन भावांनी सेंद्रिय शेती सुरू करण्यासाठी बँकर करिअर सोडले. इतकेच नाहीतर या सेंद्रिय शेतीच्या महत्त्वाबद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. पुण्याजवळील भोदनी गाव शेतीसाठी समृद्ध आहे. सेंद्रिय शेतीमध्ये भरघोस उत्पन्न घेत या दोन भावांनी शेतातून तब्बल १२ कोटींची उलाढाल केली. या दोन्ही भावांनी शालेय शिक्षण पुणे येथे पूर्ण केले.
शेतीमध्ये येण्यापूर्वी सुमारे सात ते आठ वर्षे भारताच्या मेट्रो शहरांमध्ये बँकिंग क्षेत्रात या दोघांनी काम केले.सत्यजित हंगे आणि अजिंक्य हंगे यांनी २०१४ मध्ये स्वता:ची सेंद्रिय शेती सुरू करण्यासाठी बँकर्स म्हणून नोकरी सोडली. दोन ब्रदर्स सेंद्रिय फार्म (टीबीओएफ) या नावाने आपला ब्रँड तयार केला आणि यशस्वी सुद्धा करून दाखविला. विशेष म्हणजे हे दोन्ही भावांचा लहानपणासून शेतीशी काही संबंध नव्हता. ते म्हणतात आम्हाला सेंद्रिय शेतीचे ज्ञान होते, परंतु आपल्या आसपासचे बरेच लोक ते राबवत नव्हते. आम्ही पारंपारिक शेती करणाऱ्या भारतभरातील शेतकऱ्यांना भेटण्यास सुरुवात केली. यावरून त्यांना असे दिसून आले सेंद्रिय शेती देशाच्या निरनिराळ्या भागातील काही ठराविक ठिकाणी आहे, परंतु आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या पद्धतीने नव्हती.
रासायनिक खतांचा वापर आणि त्याचे दुष्परिणाम आम्हाला कळले त्या दिवशी पासून आम्ही ते वापरणे बंद केले. आम्ही आमच्या शेतात खत घालण्यासाठी शेण खत म्हणून वापरात आणल्याचे सत्यजित म्हणाले. पारंपारिक खत शेणखत वापरल्याने जमिनीला सूक्ष्म आणि मॅक्रो पोषक तत्त्वे मिळतात. सुपीकतेमध्ये भर घालण्यासाठी त्यांनी शेतातील सेंद्रिय कचऱ्याने ओढणी केली. मोनो-पीक एक विशिष्ट पोषकद्रव्य कमी होण्यास कारणीभूत ठरते, तर बहु-पीक घेण्यामुळे मातीची सुपीकता, मातीचा कण आकार, पाणी धारण क्षमता वाढते आणि शेवटी शेतीच्या जैवविविधतेत वाढ होते.
सेंद्रिय शेती करण्याऱ्या शेतकऱ्यांना बाजारपेठ समजणे महत्वाचे आहे
पपई फळ त्यांच्या पहिल्या चाचण्यांपैकी एक होती. सत्यजित म्हणाले की, हे फळ बाह्य स्वरुपाने आकर्षक वाटत नसले तरी त्याची गोडी चांगली असते. तसेच या फळाचे अनेक औषधी गुणधर्म आहे. “आम्ही आमचा टीबीओएफ ब्रँड विकसित करण्यास सुरुवात केली आणि आमचे उत्पादन मॉल आणि मार्केटमध्ये नेले आणि आता ऑनलाइन मार्केटमध्ये विकण्यास सुरुवात केली.''आम्ही सुरुवातीला हातगाड्यांवर आमची सेंद्रिय फळे विकली आणि लोकांना सेंद्रिय उत्पादनांचे महत्त्व पटवून दिले. या कालावधीत आमचा ग्राहक वर्ग वाढला. आम्ही आमची उत्पादने भारताशिवाय जगभरातील ३४ देशांमधील आणि ६६४ शहरांमधील ४५ हजार ग्राहकांना वितरित करत असल्याचेही'', ते म्हणाले.
आपल्या यशाबद्दल बोलताना सत्यजित पुढे म्हणाले की, २०१६ मध्ये आमची वार्षिक उलाढाल २ लाख रुपये होती. पण आता वर्षाकाठी साधारणत: १२ कोटींची उलाढाल केली जाते. तूप, गूळ, मिरची पावडर शेंगदाणा ,लोणी, शेंगदाणा तेल, पारंपारिक गव्हाचे पीठ, ज्वारीचे वाण आणि पौष्टिक भात यांचा संपूर्ण जगात प्रसिद्ध ब्रँड तयार करणे आणि त्यापासुन भरघोस उत्पन्न घेण्यास ते टेक सोल्यूशनवरही काम करत आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना पाऊस, वारा आणि यंत्राशी संलग्न असलेल्या विविध सेन्सरसह इतर घटकांची माहिती मिळेल. सेंद्रिय शेतीतून आम्ही स्थानिक समुदायाला वाढण्यास आणि स्थानिक विविधतेला चालना देण्यासाठी मदत करत आहोत. स्थानिक शेतकऱ्यांना सक्षम बनविणे आणि ही कल्पना जगभर पोहोचविणे हे आमचे उद्दीष्ट आहे.
Published on: 05 September 2020, 06:40 IST