Success Stories

बटाटे, टोमॅटो आणि वांगी याची लागवड आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर केली जाते. हे तिन्ही उत्कृष्ट भारतीय भाजीपाला (Vegetable Crop) म्हणून ओळखले जाते. अनेक शेतकरी याची लागवड करतात. यामध्ये आता अनेक बदल होत चालले आहेत. ही तिन्ही पिके एकाच रोपावर वाढू शकतील अशी किमया सध्या शास्त्रज्ञांनी केली आहे. यामुळे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Updated on 20 July, 2022 10:42 AM IST

बदलत्या काळात शेतीमध्ये अनेक बदल होत गेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढले आहे. यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले आहेत. बटाटे, टोमॅटो आणि वांगी याची लागवड आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर केली जाते. हे तिन्ही उत्कृष्ट भारतीय भाजीपाला (Vegetable Crop) म्हणून ओळखले जाते. अनेक शेतकरी याची लागवड करतात. यामध्ये आता अनेक बदल होत चालले आहेत.

ही तिन्ही पिके एकाच रोपावर वाढू शकतील अशी किमया सध्या शास्त्रज्ञांनी केली आहे. यामुळे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तिन्ही एकाच रोपावर वाढू शकतात यावर कोणाचा कधी विश्वास बसेल का? कदाचित विश्वास बसणार नाही मात्र देशातील शास्त्रज्ञांनी (Agriculture Scientists) ही गोष्ट देखील सिद्ध करून दाखवली आहे.

यामुळे सध्या शास्त्रज्ञांच्या या प्रयोगाचे कौतुक केले जात आहे. बटाटा आणि टोमॅटो (Tomato Crop) एकाच रोपावर याआधीच उत्पादित करण्याची किमया (grafting technique) साधली गेली आहे. आता ही संकल्पना वाराणसीमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च (IIVR) चे संशोधक त्याची गुणवत्ता आणि प्रमाण सुधारण्यासाठी आणखी प्रयत्न करत आहेत. यामुळे येणाऱ्या काळात देखील यामध्ये अजून बदल होणार आहेत.

आता शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार!

या शास्त्रज्ञांना आता पोमॅटोच्या रोपावर वांगी उगवण्यात यश आले आहे. आता एकाच झाडावर टमाटे, बटाटे आणि वांगी या तिन्ही पिकांचे उत्पादन घेता येणार आहे. याला त्यांनी ब्रिटो असे नाव दिले आहे. यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. अनेक वेगवेगळ्या कृषी प्रदर्शनात देखील याची झलक आपल्याला बघायला मिळते. यामध्ये मिरचीचे देखील उत्पादन घेतले आहे.

येथील शास्त्रज्ञ डॉ अनंत कुमार म्हणाले, नवीन बहुविध वाण विकसित करण्यासाठी पाच वर्षांचे संशोधन लागले. पोमॅटोच्या प्रत्येक रोपातून दोन किलो टोमॅटो आणि 600 ग्रॅम बटाटे मिळू शकतात. यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, मातीचा खालचा थर बटाट्यासाठी असतो आणि वरचा थर टोमॅटोसाठी असतो. यामुळे हे साध्य होते. अगदी तसेच वांगी आणि मिरची वाढवण्यासाठी अतिरिक्त थरांचा वापर केला जातो.

शेतकऱ्यांनो आता पॉलिहाऊसचा खर्च वाचणार, प्लॅस्टिक बोगद्याची शेती ठरतेय फायदेशीर, जाणून घ्या..

तसेच घरात कुंडीत देखील ही झाडे येतात. यामुळे आपण घरगुती देखील याची लागवड करू शकतो. मोठ्या लागवडीसाठी, ही झाडे जमिनीत कलम केली जातात परंतु वापरासाठी तयार होण्यास जास्त वेळ लागतो.

महत्वाच्या बातम्या;
काय सांगता! आता मोबाईल अ‍ॅपवर करा जनावरांची विक्री, दुधाचे प्रमाणही समजणार
लाखो रुपये कमवून देणारं पावसाळ्यातील हक्काचे पीक, जाणून घ्या तिळाची लागवड
लाथ मारीन तिथे पाणी काढीन! बीडच्या पठ्याने दुष्काळी भागात केली सफरचंदाची बाग

English Summary: tomatoes, brinjal, potatoes on one tree, scientists revolutionized agriculture
Published on: 20 July 2022, 10:42 IST