वेळेचा सदुपयोग आणि सरकारी योजनांचा फायदा कशा पद्धतीने घ्यावा हे सतना जिल्ह्यातील तीन तरुणांकडून शिकले जाऊ शकते दोन वर्षे अगोदर आलेल्या कोरोना महामारी पासून वाचण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मध्ये नोकरी करणाऱ्या या तीन तरुणांनी मिळून गावात जैविक शेती करायला सुरुवात केली
यामध्ये त्यांनी घेतलेली मेहनत आता फळाला उतरत आहे. या तीनही तरुणांनी सुरू केलेल्या शेतीच्या माध्यमातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. तसेच गावातील आणि अन्य परिसरातील शेतकऱ्यांचा जैविक शेती कडे कल वाढावा यासाठी हे तीन तरुण निशुल्क प्रशिक्षण देखील देत आहेत. मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात राहणारे आणि नोकरीपेशा असलेले संजय शर्मा, हिमांशू चतुर्वेदी आणि अभिनव तिवारी असे या तीन तरुणांचे नाव असून त्यांनी दोन वर्षे अगोदर कोरोना पासून वाचण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मध्ये सगळेजण वर फ्रॉम होम करत असताना अजूनही तरुणांनी घरी असताना वाचलेल्या वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून मिळून जैविक शेती करायचा निर्णय घेतला.
तयार केले जात आहे जैविक शेतीचे मॉडेल
या तीनही तरुणांनी जैतवारा बिरसिंगपुर रोड येथे कामधेनु कृषक कल्याण समितीच्या माध्यमातून एक जैविक शेतीचे मॉडेल तयार केले आहे. या संस्थेच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना पारंपरिक शेती पद्धती पासून दूर करून त्यांना नैसर्गिक जैविक शेती करण्याच्या पद्धती विषयी माहिती दिली जात आहे. यामध्ये त्यांना उद्यान विभागाची देखील मदत मिळत आहे. दोन वर्षे अगोदर बगहायेथील केशव माधव गोशाळा येथून जैविक शेतीची सुरुवात करणाऱ्या या तरुणांना उद्यान विभागाची देखील मदत मिळत आहेत. या अंतर्गत विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून उन्नत बी-बियाणे,रोपे, वर्मी कंपोस्ट युनिट तसेच सिंचनासाठी स्प्रिंकलर देखील दिले जात आहे.
भाजीपाला सोबत जैविक खतांचे देखील करीत आहेत उत्पादन
सतना जिल्ह्यामध्ये ओळख निर्माण करणारे या तीनही तरुण भाजीपाला सोबतच जैविक खतांचे देखील उत्पादन करीत आहेत. यामध्ये हळद, कांदा,बटाटा,धैचावर्मी कंपोस्ट इत्यादी जैविक खतांचा आणि भाजीपाला पिकांचा देखील समावेश आहे.
योजनाचा लाभ मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या मानले आभार
शेतकऱ्यांना समृद्ध बनण्यासाठी मध्यप्रदेश सरकार द्वारा चालवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ मिळाल्यानंतर या तीनही तरुणांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांना धन्यवाद दिले.सोबतच अन्य शेतकऱ्यांना देखील सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे.
Published on: 13 February 2022, 11:13 IST