Success Stories

ग्रॅज्युएशन करा चांगली पाच आकडी पगाराची नोकरी शोधा आणि मिळाली तर त्यातच सगळे आयुष्य खुश रहा असे काहीसे धोरण तरुणवर्गाचे आहे. शेतकरी कुटुंबातील तरुण देखील याच मार्गाने जात आहेत.

Updated on 12 April, 2022 7:20 PM IST

ग्रॅज्युएशन करा चांगली पाच आकडी पगाराची नोकरी शोधा आणि मिळाली तर त्यातच सगळे आयुष्य खुश रहा असे काहीसे धोरण तरुणवर्गाचे आहे. शेतकरी कुटुंबातील तरुण देखील याच मार्गाने जात आहेत.

शेती करणे म्हणजे तोट्याचा धंदा असे गणितच तरुण  वर्गाच्या डोक्यात आहे. त्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष होत असून मिळालेल्या पदवीची पुरचुंडी बॅगेत घेतली की शहराची वाट धरली जात आहे. परंतु याला बरेच तरुण अपवाद देखील आहेत. उच्च शिक्षण घेऊनसुद्धा नोकरीच्या मागे न लागता आपल्या घरच्या शेतात विविध प्रकारची पिके तंत्रज्ञानाच्या मदतीने घेऊन उत्कृष्ट उत्पादन मिळवीत आहेत.असे  बरेच उदाहरण पाहायला मिळतात की तरुणांनी शेतीमध्ये विश्वास बसणार नाही अशी प्रगती केली आहे. किंबहुना वेगवेगळ्या पिकांच्या माध्यमातून  अभ्यासपूर्ण रीतीने चांगले उत्पादन आणि उत्पन्न देखील मिळवली आहेत. या लेखामध्ये आपण अशाच एका उच्चशिक्षित तरुणाच्या एका यशस्वी शेतीबद्दल  माहिती घेणार आहोत.

नक्की वाचा:ऐकावे ते नवलंच! शेती करत राहिल्यामुळे माणसाच्या उंचीत झाली घट; एका संशोधनात गजब सत्य उजागर

एका उच्चशिक्षित तरुणाने अवघ्या 75 दिवसात केली 13 लाखाची कमाई

 या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे सागर प्रवीण पवार. हे मूळचे धुळे जिल्ह्यात असलेल्या शिंदखेडा तालुक्यातील पाटणगावचे रहिवासी असून त्यांचे शिक्षण बीएससी( ॲग्री ) झाले आहे. त्यांनी त्यांच्या पाच एकर क्षेत्र असलेल्या शेतामध्ये कलिंगडाची लागवड केली. परंतु लागवड करताना या पिकासाठी असलेले सगळे आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि यंत्राचा वापर त्यांनी केला. कलिंगडाची लागवड देखील त्यांनी यंत्राच्या साहाय्याने केली. लागवड करताना दोन रोपांमध्ये दीड फुटाचे अंतर ठेवून पाच एकर मध्ये जवळजवळ पंचावन्न हजार रोपांची लागवड केली. हे कलिंगड चे पीक घेत असताना सगळ्या गोष्टी सागर यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने केल्या. कलिंगड यासाठी खताचे व्यवस्थापन करताना  आठ ते दहा दिवसांच्या अंतराने कलिंगडाला शिफारशीत खत मात्रा दिली. त्यासोबतच पाण्याचे व्यवस्थापन देखील योग्य पद्धतीने ठेवले. या सगळ्या नियोजनाचा परिपाक म्हणून अगदी पंच्याहत्तर दिवसातच त्यांचे कलिंगड काढणीला आले व विक्रीसाठी बाजारात दाखल देखील झाले. या कलिंगड चा विक्रीतून सागरला तब्बल 13 लाख 32 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून त्यासाठी सागरचे विक्री नियोजन देखील कामी आले.

 कलिंगड विक्रीसाठी सागर यांनी स्थानिक बाजारपेठेला पसंती न देता दिल्लीच्या व्यापाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला व  देशातील विविध बाजारपेठांमध्ये या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून विक्रीसाठी कलिंगड पाठवले. योग्य व्यवस्थापन व विक्री कौशल्य या जोरावर कलिंगडाचे विक्रमी उत्पादन तर घेतले परंतु विक्रमी असे आर्थिक उत्पन्न देखील मिळवले आहे. सागर ने हे पीक सात ते नऊ जानेवारी दरम्यान रोपांची लागवड केली होती.

नक्की वाचा:थकीत ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक; थेट कारखानाच केला बंद

सात फूट अंतरावर यंत्राच्या साह्याने ही लागवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे मायक्रोन मल्चिंग पेपरचा वापर करून एका एकरामध्ये आठ हजार रोपांची लागवड सागर यांनी केली. मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळे उन्हाळ्यात होणारे पाण्याचे बाष्पीभवन टळले व कमी पाण्यामध्ये याची गरज भागवली गेली व पाण्याची बचत देखील झाली. त्यांनी पिकवलेल्या कलिंगडाला दिल्ली, मुंबई आणि गुजरात मधील काही व्यापार्‍यांनी चांगला प्रतिसाद दिला असून त्यांच्या माध्यमातून हे कलिंगड उत्तम रित्या सागरने विकले आहे. 

त्यामुळे या उदाहरणातून असे दिसून येते की तुम्ही. व्यवसायामध्ये  तुम्ही राहिलात आणि तुमच्यात जिद्द, करत असलेल्या व्यवसायाबद्दल चा अभ्यास, बारीक बारीक गोष्टींविषयी योग्य नियोजन आणि आपले उत्पादन विक्री करण्याचे कौशल्य जर असले ना तर कुठल्याही व्यवसायात निश्चित यश मिळते. हेच या माध्यमातून दिसून येते.

English Summary: this young farmer take thirteen lakh earning through watermelon cultivation
Published on: 12 April 2022, 07:20 IST