1. यशकथा

अतिदुर्गम भागातील दीड एकर शेतीत भाजीपाला पिकवून ही महिला कमवतेय लाखो रुपये

KJ Maharashtra
KJ Maharashtra
vegetables

vegetables

आपल्या समाजातील लोक शेतीला बिन फायद्याचा म्हणजेच तोट्याचा व्यवसाय असे म्हणतात दुर्गम भागात शेती करून लाखो रुपयांचे उत्पादन कसे घेतात या विषयी सविस्तर माहिती वर्ष भर राब राब राबून शेतकरी शेतामध्ये कष्ट करतो. परंतु शेतातील निघणाऱ्या पिकाला योग्य बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी वर्ग हा अडचणीत येत आहे.

दीड एकर शेतजमिनीतून लाखो रुपयांचे उत्पादन:

शेतकरी आपल्या राणामध्ये अनेक प्रकारची वेगळी वेगळी पिके घेतो त्यामध्ये ज्वारी बाजरी कांदा ऊस इत्यादी. अमरावती जिल्ह्यातील धरणी तालुक्यातील रोडवर पालेभाज्या विकणारी एकता कणसे ही स्त्री दीड  एकर  शेतजमिनीतून  लाखो  रुपयांचे उत्पादन घेत आहे.एकता कणसे ही महिला आपल्या दीड एकर शेतीमध्ये भाजीपाला पिकवते. आणि ताजा भाजीपाला रोड वर बसून विकतात. त्यामुळे त्यांना चांगलाच फायदा यातून मिळतो.

हेही वाचा:कमी पाण्यावर खजूर शेती करून हा शेतकरी कमवतोय लाखो रुपये

या भाजीपाल्याचे विशेष म्हणजे या मधील सर्व भाजीपाला हा सेंद्रिय पद्धतीने पिकवला जातो त्यामुळे येणारे लोक सुद्धा आवर्जून येथील भाजीपाला खरेदी करत असतात.एकता कणसे यांनी आपल्या रानात भाजीपाला या बरोबर मका सुद्धा लावली होती.त्यामुळे त्यांचा दिवसाला धंदा हा 6 ते 7 हजार रुपये एवढा होयचा. त्यातून त्यांना महिन्याला 1 ते दीड लाख रुपये एवढे पैसे मिळायचे.

अमरावती सारख्या अतिदुर्गम भागात दीड एकर शेतीमधून लाखो रुपयांचे उत्पादन घेणे खरच अविश्वसनीय आहे.त्यांनी आपल्या या शेतीप्रयोगातून लोकांना या कोरोना काळात एक चांगला आदर्श घडवून आणला आहे.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters