Success Stories

काळाच्या ओघात शेतकरी शेतपद्धतीमध्ये बदल करू लागले आहेत मात्र त्यासाठी आधी तेथील भौगोलिक स्थिती तसेच वातावरणामध्ये होणारा बदल आणि उत्पादनात वाढत असलेल्या खर्चाचा सर्व विचार तर करावा लागतोच. मात्र कष्ट करण्याची तयारी आणि मनात जर जिद्द असेल तर डोंगराळ भागात सुद्धा शेती होऊ शकते याचे खास उदाहरण म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव मधील उमेश झाडे हा शेतकरी. उमेश ने कोरडवाहू जमीन तसेच प्रतिकूल वातावरणामध्ये द्राक्षाची बाग लावली होती जे की अनेक लोक उमेशवर हसत होते पण उमेश आजिबात त्यांची मनावर कोणतीही गोष्ट न घेता रात्रीचा दिवस करून बागेची जोपासना करू लागला. आजच्या स्थितीला जर त्याची बाग पहिली तर नावे ठेवणारे लोक सुद्धा मान खाली घालतील. उमेश ने जवळपास सव्वा एकर क्षेत्रात द्राक्षाची बाग लावली होती जे की आता ती छान बहरली आहे. पहिले वर्ष असल्यामुळे गेलेला खर्च पदरी पडेल का नाही हे माहीत नाही पण पुढे उत्पादनात भरपूर फरक पडणार असल्याचे उमेश सांगतो.

Updated on 22 February, 2022 7:05 PM IST

कशी झाली सुरवात?

राळेगाव तालुक्यातील वाढोणाबाजार गावामध्ये उमेश राहतो. उमेश पहिल्यापासून आपल्या आठ एकर शेतीमध्ये कापूस आणि सोयाबीन हे पारंपरिक पीक घेत होता मात्र बाजारपेठेत त्यास भाव मिळत नसल्यामुळे त्याला नेहमी तोटा होयचा. उमेश ने यावर विचार केला आणि थेट द्राक्षाची लागवड करणे सुरू केले जे की कलम आणण्यासाठी उमेश पंढरपूर मधील कासेगाव ला गेला. उमेश ने १ डिसेंम्बर २०२० रोजी आपल्या सव्वा एकर जमिनीमध्ये पंधराशे कलमांची लागवड केली जे की ३ महिन्याने त्याची रिकट केली व ड्रीप मधून पाणी देण्याचे नियोजन केले.

कापूस पट्ट्यात बहरली द्राक्षाची बाग :-

यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन घेतले नाते कारण तिथे पाण्याची सोय नसल्यामुळे पारंपरिक पिकच घ्यावे लागते. पश्चिम महाराष्ट्रात जसे शेतकरी द्राक्षाची लागवड करतात त्याचप्रमाणे उमेश ने सुद्धा बाग धरली. पहिलेच वर्ष असल्यामुळे सव्वा एकरात बागेला द्राक्षे ही लागले आहे. उमेश ने कोरडवाहू शेतीमध्ये हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. जरी यवतमाळ जिल्हा कापसासाठी प्रसिद्ध असला तरी तो शेतकऱ्यांच्या आत्महत्या गाजलेला आहे. मात्र उमेश या पठ्याने द्राक्षाची लागवड करून सिद्ध केले की मनात जर जिद्ध असेल तर माणूस काहीही करू शकतो.

पीक पध्दतीमध्ये बदल करण्याची हीच योग्य वेळ :-

उमेश च्या या यशस्वी प्रयोगामुळे तेथील शेतकरी सुद्धा पीक पद्धतीमध्ये बदल करण्याचा विचार करत आहेत. ज्या शेतकऱ्यांना पाण्याची सोय आहे त्यांनी मोसंबी, द्राक्षे तसेच संत्री च्या बागेकडे ओळावे कारण कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेऊन देणाऱ्या या बागा आहेत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी मोसंबी, द्राक्षे तसेच संत्री ची बाग धरावी. काळाच्या ओघात शेतीमध्ये बद्धल करण्याची व शेतीमध्ये जास्त उत्पन्न घेण्याची हीच ती योग्य वेळ असल्याचे जिल्ह्याचे कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे यांनी सांगितले आहे.

English Summary: This farmer set a new standard for the farmers of Yavatmal district by holding a vineyard on dry land.
Published on: 22 February 2022, 07:05 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)