सतीश देशमुख हे उच्च शिक्षित शेतकरी हे करंबक गावात तालुका पंढरपुर व जिल्हा सोलापूर इथे राहतात. देशमुख यांनी त्यांच्या दीड एकर क्षेत्रावर सुमारे ११ भाजीपाल्याची शेती केली जे की पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने शेती केली होती. या झिरो बजेट शेतीमधून त्यांना अवघे चार महिन्यात तब्बल तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. देशमुख यांच्याकडे एमए, बीएडची पदवी सुद्धा आहे तरीही त्यांनी शेतीकडे आपला कल ओळवला.
दहा प्रकारच्या भाज्यांची आंतरपीक पद्धतीने लागवड:-
देशमुख यांनी त्यांच्या दीड एकर क्षेत्रातील द्राक्षाची बाग काढल्या नंतर तारेचे जे कंपाउंड होते ते तसेच ठेवले आणि त्या दीड एकर क्षेत्रात टोमॅटो, वांगी, मिरची, त्ताकोबी, ढोबळी मिरची, भेंडी, कारले, दोडका, दुधी भोपळा, घेवडा, गोसावळे याप्रमाणे अनेक प्रकारच्या फळभाज्यांची लागवड केली आहे. तारेच्या कंपाउंड वर वेल वर्गीय वनस्पती चढवलेल्या आहेत तसेच प्रत्येक दोन ओळीत फळभाजी लावलेली आहे.सध्या फळभाज्यांच्या हंगाम चालू आहे त्यामुळे व्यापारी वर्ग जाग्यावरच येतात आणि भाज्या घेऊन जातात त्यामधून देशमुख यांना रोज दोन ते अडीच हजार रुपये नफा मिळतो. हा हंगाम गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे आणि पुढील दोन महिने हा हंगाम राहील अशी अशा देशमुख यांना आहे.
झिरो बजेट शेती तसेच गाईचा योग्य प्रकारे वापर:-
देशमुख यांनी १९ देशी गाई तर ४ म्हशी पाळलेल्या आहेत जे की निवारा चे जे शेड आहे त्याला लागूनच प्लास्टिक चा कागद अंथरलेला असून त्यावर गांडूळ खताचे बेड तयार केले आहे. जे रोज शेण निघेल ते त्या बेडवर जमा केले जाते. ज्यावेळी बेड ची साठवण क्षमता संपली की तेथील गाई म्हशी दुसऱ्या शेड मध्ये नेहल्या जातात अशा प्रकारे गांडूळ खत तयार होते. एवढेच नाही तर जमिनीतील पोषकद्रव्ये वाढावी म्हणून शेण, गोमूत्र तसेच गूळ आणि बेसनपीठ यापासून तयार होणारे जे स्लर तयार होते ते तीन दिवसातून एकदा वापरले जाते.
कीटकनाशकांचीही सेंद्रिय निर्मिती:-
शेतामध्ये जो भाजीपाला पिकवला आहे त्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून देशमुख यांनी घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने जी कीटकनाशके तयार केली आहेत त्याची फवारणी करतात. हे सेंद्रिय कीटकनाशक तयार करण्यासाठी २५ किलो कडुनिंबाचा पाला, कोवळ्या फांद्या, २ किलो गुळवेल आणि ५ लिटर गोमूत्र २५ लिटर पाण्यात उकळून घ्यावे. हे जे मिक्स केलेले द्रावण आहे ते जवळपास १२ ते १३ लिटर होईपर्यंत उकळले जाते आणि तेच कीटकनाशक म्हणून फवारणी केली जाते.
गांडूळ खत व दूध-तुपातूनही उत्पन्न:-
देशमुख यांनी पाळलेल्या २३ जनावरांचे जे मल मूत्र असते त्यापासून जे गांडूळ खत तयार होते ते शेतीसाठी वापरले जाते आणि जे राहिलेलं खत आहे त्याचे १ किलो, २ किलो तसेच पाच किलो चे पॅकिंग करून विकले जाते. याशिवाय देशी तूप तसेच दूध सुद्धा विकले जाते.
Published on: 29 September 2021, 11:51 IST