Success Stories

परभणी पासून १५ किमी ताडकळस राज्य रस्त्यावर मिरखेल गाव आहे. भाजीपाला प्रमुख म्हणून या गावाची ओळख आहे. या गावामध्ये १७ वर्षांपासून विठ्ठल धामणे नावाचे शेतकरी १७ वर्षांपासून शेती करत आहेत. विठ्ठल यांनी मागील अनेक वर्षांपासून दोन एकर वर बारमाही भाजीपाला उत्पादन घेण्याची पद्धत अवलंबली आहे. परंतु तिथे रस्ता नीट नसल्यामुळे पावसाळ्यात भाजीपाला वाहतूक करण्यासाठी अडचणी निर्माण होतात त्यामुळे त्यांनी गावापासून जवळ असलेली सिंचन सुविधा असलेली दिन एकर जमीन भाड्याने घेतलेली आहे जे की प्रति एकर २० हजार रुपये करार केला आहे.

Updated on 13 September, 2022 8:41 PM IST

असे होते भाजीपाला उत्पादन :-

धामणे यांनी वर्षभर विविध सण, समारंभ तसेच ऋतू नुसार शेतीमालाला मागणी असते जे की वांगी, टोमॅटो, दोडकी, कारली, दुधी भोपळा, चवळी, भेंडी, फ्लॉवर, अळू यासारखी पिके ते शेतात घेतात. पावसाळ्यात टोमॅटो, चवळी, भेंडी ची लागवड केली जाते. दोडक्याचा प्लांट सुरू झाला की तो तीन महिन्यापर्यंत चालतो तसेच वांगे सुमारे सहा महिने शेतात असते. दिवाळी नंतर वांग्याची लागवड सुरू होते तर वेलवर्गीय पिकांसाठी तारा तसेच बांबू तयार करण्यात येतो. शेताच्या बांधावर विविध प्रकारची झाडे देखील आहेत. जे की या झाडांमुळे उन्हाच्या झळांपासून सरंक्षण होते.

हेही वाचा:सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग, वेलची व रेड बनाना वाणांची केळी लावून घेतले यशस्वीरित्या उत्पादन

स्वच्छता, प्रतवारी व विक्री :-

जेव्हा बाजारात आपणास माल पाठवायचा असतो त्याच्या आधीच्या दिवशी काढणी केली जाते जे की शेतातच मालाची प्रतवारी केली जाते. जो की तो माल पाण्यात स्वच्छ धुतला जातो तर तो माल पॅकिंगसाठी तागाची पिशवी वापरली जाते जे की त्यामध्ये चांगल्या प्रकारे माल सुरक्षित राहतो. यामुळे भाजीपाला चा दर्जा टिकून राहतो आणि बाजारपेठेत देखील चांगला दर भेटतो.

हेही वाचा:तांदळाच्या पाण्याचं सेवन केल्याने शरीरास होतात हे जबरदस्त फायदे, ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नसेल!

ताज्या उत्पन्नाची हमी :-

उन्हाळ्यात जास्तीत जास्त लग्न समारंभ असतात जे की त्यामध्ये वांग्याची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. यावेळी उन्हाळ्यात वांग्याला प्रति किलो ४० ते ६५ रुपये दर मिळला तर दोडक्याला प्रति किलो ५० ते ६० रुपये दर मिळत आहे. दररोज ४०० रुपये वाहनाला भाडे आहे. जे की शेतात अगदी ताजा भाजीपाला असतो त्यामुळे अगदी ताज्या उत्पनाची हमी दिली असते. अगदी शेतातून ताजा माल सरळ बाजारपेठेत पाठवला जातो.

English Summary: This farmer from Parbhani is producing from perennial vegetables, learn about vegetable farming management
Published on: 13 September 2022, 08:38 IST