स्ट्रॉबेरी म्हणले थंड हवेचे ठिकाण जे की महाबळेश्वर. महाबळेश्वर मध्ये थंड वातावरणात स्ट्रॉबेरी चे पीक जोमाने वाढते. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने महाबळेश्वर ची स्ट्रॉबेरी उष्ण वातावरणात पिकवून दाखवली आहे. उस्मानाबाद मधील तोरंबा तालुक्यातील पहिल्यांदाच हा प्रयोग केला होता जो की यशस्वीपणे पार पडलेला आहे. जे की स्ट्रॉबेरी पिकासाठी आपल्या भागात अनुकूल वातावरण आहे असे सांगत त्याने महाबळेश्वरपेक्षाही जास्त उत्पन्न मिळवल्याचा दावा केला आहे. या शेतकऱ्याने १२ गुंठ्यात जवळपास ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल असे सांगितले आहे. जे की उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वत्र या शेतकऱ्याची चर्चा सुरू आहे.
सलग दोन-तीन वर्षे पाऊस तर सलग दोन-तीन वर्षे दुष्काळ :-
उस्मानाबाद जिल्ह्यात जर सलग दोन ते तीन वर्षे पाऊस पडला तर तिथून पुढे सलग दोन ते तीन वर्षे दुष्काळ हा ठरलेला असतो. जे की उस्मानाबाद जिल्ह्यात पाण्याविना शेतीव्यवसाय अभावी ठरलेला आहे. एकदा की दुष्काळ पडला की उभे असलेले पीक खाली पडते. परंतु शेतकरी हार न मानता पुन्हा पीक उभा करण्याच्या तयारीला लागतो. आपल्या शेतात नेहमी तो नवीन प्रयोग करून त्यामधून संधीचे सोने करायला पाहत असतो. जे की याच प्रकारे नवीन वाट शोधत उस्मानाबाद जिल्ह्यातील तोरंबा येथील शेतकरी सचिन सुर्यवंशी यांनी आपल्या शेतात एक नवीन प्रयोग केला आहे जे की यावर विश्वास बसने ही कठीणच आहे. जे की त्यांनी केलेल्या या प्रयोगाला या देखील मिळाले आहे.
आतापर्यंत पावणेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले :-
सचिन सुर्यवंशी या शेतकऱ्याने आपल्या सातारा जिल्ह्यातील मित्रांच्या मदतीने तोरंबा परिसरातील १२ गुंठा क्षेत्रात स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली. सध्या याच लागवड केलेल्या स्ट्रॉबेरी ची काढणी सुरू आहे. सचिन ला आतापर्यंत जवळपास पावणे तीन लाख रुपयांचे उत्पन्न भेटले आहे जे की अजून दीड लाख रुपयांचे उत्पन्न भेटेल अशी त्यांना अशा आहे. सचिन सांगतात की मी सातारा जिल्ह्यात काही वर्षे वास्तव्यासाठी होतो त्यामुळे मला नेहमीच स्ट्रॉबेरी शेतीबद्धल कुतूहल आणि उत्साह असायचा. सातारा जिल्ह्यात माझे काही मित्र होते ज्यांची स्ट्रॉबेरीची शेती होती. जे की मित्रांच्या सहवासात राहून मी शेतीचा अभ्यास केला आणि आपल्या भागात हा प्रयोग करून पहावा अशी उत्सुकता ध्यानीमनी लागली. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये मी १२ गुंठ्यावर स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली.
२०० ते २५० रुपये प्रतिकिलो स्ट्रॉबेरी ला दर :-
सचिनने लावलेल्या स्ट्रॉबेरी चा आकार ही मोठा आहे तसेच त्यामध्ये मिठास देखील अधिकच आहे त्यामुळे स्ट्रॉबेरी ला भाव चांगलाच मिळाला. सध्या सचिन यांच्या स्ट्रॉबेरी ची विक्री उस्मानाबाद तसेच सोलापूर बाजारपेठेत होत आहे. स्ट्रॉबेरी प्रतिकिलो २०० ते २५० रुपये दराने विकली जात आहे. अशा प्रकारे भाव मिळाला असून सचिन यांना पावणे तीन लाख रुपयांचे उत्पन्न देखील मिळाले आहे. येत्या काही दिवसात सचिन याना अजून दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी अशा आहे.
Published on: 19 March 2022, 03:49 IST