उत्तर प्रदेश राज्यातील बुंदेलखंड ठिकाणी जी नैसर्गिक आपत्ती आली होती त्यामुळे तिथे पूर्णपणे उध्वस्त झाले होते. मात्र तेथील एका शेतकऱ्याने त्याच्या शेतीमध्ये केशराची लागवड करून एक इतिहासच रचलेला आहे. केशर च्या शेतीने या शेतकऱ्याचे जणू नशीबच बदलले आहे असे चित्र त्या ठिकाणी दिसत आहे. या शेतकऱ्याने फक्त १ बिघा शेत जमिनीत ८ किलो केशराची लागवड केली होती. त्याने जवळपास हे सर्व केशर १२ लाख रुपयांना विकले आहे जो की त्याला चांगला फायदा झालेला आहे.
आपल्या शेतात केली अमेरिकन केशराची लागवड :-
उत्तरप्रदेश राज्यातील बुंदेलखंडमधील हमीरपूर जिल्ह्यातील बिवांर या परिसरातील शेतकरी भुपेंद्र यांनी नैसर्गिक आपत्तीना न खचता त्याचा सामना करून आपण काही तरी वेगळे करायचे असे मनोमन योजून केशर ची शेती करण्याचा निर्णय घेतला. भुपेंद्र या शेतकऱ्याने आपल्या १ बिघा शेत जमिनीत अमेरिकन केशर ची लागवड केली होती. भुपेंद्र ने केशर चे अर्धा किलो बी विकत आणले जे की त्यास सर्वसाधारण २० हजार रुपये खर्च आला. अमेरिकन केशर चे आणलेले जी बियाणे होते ते त्यांनी आपल्या शेतात पेरले.
रात्रंदिवस मेहनत करून फुलवले केशर :-
भुपेंद्र या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये रात्रंदिवस परिश्रम घेऊन केशर चे पीक घेतले आहे. केशर ची कापणी झाल्यानंतर त्याचे फुल जवळपास ५० हजार ते दीड लाख रुपयांना विकले जाते तर केशर चे बीज जवळपास ४० हजार रुपयांना विकले जाते. भुपेंद्र या शेतकऱ्याच्या गावातील शेतकऱ्यांनी त्याची प्रेरणा घेऊन आता केशर च्या शेतीत नशीब आजमावत आहेत.
सरकारने यासाठी प्रशिक्षण देण्याची शेतकऱ्यांची मागणी :-
रोहित नामक या शेतकऱ्याने सांगितले आहे की अगदी कमी खर्चात आणि महाग खते न वापरता केली जाणारी ही शेती आहे याचं प्रत्यक्ष उदाहरण आपल्या समोर आहे. सरकारने अनेक गावात कॅम्प टाकून या शेतीबाबत जागरूकता वाढवावी तसेच भुपेंद्र सारख्या शेतकऱ्यांचे उदाहरण देऊन गावातील लोकांना जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा.
Published on: 20 January 2022, 06:08 IST