कर्नाटकातील रट्टाडी गावातील सतीश हेगडे या शेतकऱ्याने कठोर परिश्रम करून विविध प्रकारच्या कृषी पिकांची लागवड करून नापिक जमिनी मध्ये लाखो रुपये कमावले आहेत.
नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून चांगले उत्पन्न काढले. पारंपारिक व आधुनिक शेती या दोन पद्धतीची त्यांनी शेती पिकवली. त्यांनी सुपारीची अनेक जातींच्या रोपांची लागवड केली. तसेच गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचा प्रयोगही यशस्वी ठरला.
सुपारी व काजूची हजारो झाडे –
सतीश हेगडे इलेक्ट्रिकलमध्ये डिप्लोमा चे शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांना बीएसएनएल मध्ये चांगली नोकरी मिळाली. नोकरीमध्ये समाधान होते रस नव्हता म्हणून त्यांनी नोकरी सोडून नापीक शेती पिकवली आज नापीक शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहे. 4 हजारहून अधिक सुपारीची तर 350 हुन अधिक नारळाची झाडे लावली.तसेच या सोबत केळी व काजूची झाडे लावली.
यासोबत दुग्धव्यवसाय कुक्कुटपालन देखील करत आहेत.नापीक असलेली शेती त्यांनी 4 वर्षात सुपीक करून दाखवली. हे एक उत्साही शेतकरी असून इतरांना शेती विषयी माहिती पोहोचवत असतात. यांना त्यांच्या कामगिरीबद्दल पुरस्कार देखील मिळाले आहेत.
कामगिरीबद्दल पुरस्कार –
1 ) 2015मध्ये धर्मस्थळ कृषी पुरस्कार
2) 2017 मध्ये कुंदापूर तालुका उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार
3) सबलदीशिनाप्पाशेट्टी पुरस्कार-2018 देण्यात आला.
4)2015 -17 मध्ये DRDP च्या कुंदापूर तालुका केंद्रीय समाजाचे अध्यक्ष म्हणून काम केले.
(स्रोत-मीE शेतकरी)
Published on: 07 February 2022, 03:51 IST