Success Stories

देशातील शेतकरी नवनवीन प्रयोग करीत आता शेतीतून लाखों रुपयांचे उत्पन्न अर्जित करताना बघायला मिळत आहेत. शेतकरी बांधव आता पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीची शेती करण्याकडे वळले आहेत. याचीच प्रचिती देणारे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे ते सोलापूर जिल्ह्याच्या माढा या तालुक्यातून. तालुक्यातील मौजे कई येथील एका प्रगतिशील शेतकऱ्यांने मिश्र शेतीचा अवलंब करीत चांगले दर्जेदार उत्पन्न प्राप्त केले आहे.

Updated on 11 March, 2022 11:05 AM IST

देशातील शेतकरी नवनवीन प्रयोग करीत आता शेतीतून लाखों रुपयांचे उत्पन्न अर्जित करताना बघायला मिळत आहेत. शेतकरी बांधव आता पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीची शेती करण्याकडे वळले आहेत. याचीच प्रचिती देणारे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे ते सोलापूर जिल्ह्याच्या माढा या तालुक्यातून. तालुक्यातील मौजे कई येथील एका प्रगतिशील शेतकऱ्यांने मिश्र शेतीचा अवलंब करीत चांगले दर्जेदार उत्पन्न प्राप्त केले आहे.

या अवलिया शेतकऱ्याने आपल्या वीस गुंठे क्षेत्रात कलिंगड आणि मिरची अशा दोन्ही पिकांची लागवड केली होती. या शेतकऱ्याने लागवड केलेल्या मिरची पिकावर सुरुवातीला भुरी रोग व अळी लागली होती. मात्र, या शेतकऱ्याने योग्य नियोजन करीत अवघ्या वीस गुंठे क्षेत्रात लावलेल्या मिरची पिकातून तब्बल सात लाख रुपयांचे उत्पन्न आपल्या पदरात घेतले आहे. प्रगतिशील शेतकरी रामचंद्र चोपडे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर येथे नोकरी करतात. नोकरी करत असताना देखील त्यांना शेती वरचे त्यांचे प्रेम शेती करण्यापासून दूर नेऊ शकले नाही.

त्यांनी नोकरी व शेती या दोघांमध्ये तारतम्य ठेवतशेती क्षेत्रात चांगले नेत्रदीपक यश संपादन केले आहे. प्रगतिशील शेतकरी रामचंद्र नेहमीच शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यास ओळखले जातात. त्यांनी शेतीमध्ये असाच एक आगळावेगळा प्रयोग करीत मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करून कलिंगड आणि मिरची लागवड केली. या पिकांना पाणी देण्यासाठी त्यांनी ठिबकसिंचन प्रणालीचा यशस्वी वापर केला. रामचंद्र यांच्याकडे केवळ चार एकर बागायती शेती आहे मात्र अल्पभूधारक शेतकरी असतानादेखील त्यांनी आपल्या शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग करीत चांगला मोठा नफा अर्ज केला आहे. रामचंद्र यांनी वावरात एक बोर लावला आहे, या बोरला चांगले पाणी असल्याने पाण्याचा प्रश्न रामचंद्र यांना कधीच भासत नाही. याच पाण्याच्या जीवावर रामचंद्र आपल्या वावरात वेगवेगळे भाजीपाला पिके लागवड करत असतात. 

त्यांना शेतीमध्ये त्यांचा मुलगा स्वप्निल देखील मोठे सहकार्य करतो. मिरची व कलिंगड लागवड केल्यानंतर सुरुवातीला मिरची पिकावर रोगाचे सावट बघायला मिळाले होते त्यावेळी त्यांना अमोल सुसलादे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यांच्याचं मार्गदर्शनाने त्यांनी मिरची पिकासाठी आवश्‍यक फवारणीचे नियोजन आखले आणि मिरची पिकावर आलेले रोगांचे सावट दूर केले. रामचंद्र यांच्या मते, 20 गुंठे क्षेत्रात लावलेल्या मिरची पिकासाठी त्यांना एकूण 70 हजार रुपये उत्पादन खर्च आला. या खर्चात मशागतीपासून ते काढणीपर्यंत सर्व खर्चांचा समावेश करण्यात आला आहे. रामचंद्र यांनी पुढे बोलताना सांगितले की, मिरची पिकास बारामाही बाजारपेठ उपलब्ध असून मिरचीला नेहमी चांगला भाव मिळत असतो याशिवाय मिरचीला जर कमी बाजार भाव प्राप्त झाला तर मिरची वाळवून लाल मिरची म्हणून बाजारात विकली जाऊ शकते.

English Summary: this farmer earn 7 lakh from chilly crop he planted on 20 guntha
Published on: 11 March 2022, 11:05 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)