Success Stories

राज्यातील शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करण्याऐवजी आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब करून, आधुनिकतेची कास धरून मागणीत असलेल्या पिकांची लागवड करीत आहेत आणि यातून चांगला बक्कळ पैसा कमवीत आहेत. कष्टाला योग्य नियोजनाची जोड देत शेतकरी बांधव अल्प कालावधीत लाखो रुपयांचे उत्पन्न अर्जित करू शकतात याचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे ते वर्धा जिल्ह्यातून. जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील मौजे पिंपरी पोहना गावचे रहिवासी शेतकरी किशोर महाजन यांनी लसणाच्या शेतीतून मात्र शंभर दिवसाच्या अल्प कालावधीत लाखोंचे उत्पन्न पदरात पाडले आहे. शेतीत नवनवीन नाविन्यपूर्ण प्रयोग करून अल्प कालावधीत आणि अल्प क्षेत्रात मोठे दैदिप्यमान यश प्राप्त केले जाऊ शकते हे किशोर यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.

Updated on 28 January, 2022 1:12 PM IST

किशोर यांनी आपल्या अवघ्या दोन एकर क्षेत्रात आधुनिक पद्धतीने लसूण लागवड करण्याचा निर्णय घेतला, तीन वर्षांपूर्वी किशोर यांनी लसूण लागवड कितीपर्यंत फायदेशीर ठरू शकते हे जाणून घेण्यासाठी मात्र एक किलो लसणाची लागवड केली होती, या प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या लागवडीतून त्यांना चांगले यश मिळाले. यामुळे त्यांनी पुन्हा दुसऱ्या वर्षी आपल्या एक एकर क्षेत्रात लसणाची लागवड केली त्यातून त्यांना सुमारे 38 क्विंटल उत्पादन प्राप्त झाले. या आपल्या प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या शेतीत मिळालेल्या दर्जेदार उत्पादनामुळे या हंगामात दसऱ्याला दोन एकरावर लसूण पिकाची लागवड करण्याचे ठरवले. किशोर यांनी दोन एकर क्षेत्रात लसूण लागवड करण्याचे ठरवले खरी मात्र त्यांना लग्नाच्या शेती विषयी पुरेसे ज्ञान अवगत नव्हते. केवळ गावकऱ्यांचा मार्गदर्शन घेऊन त्यांनी ऑक्टोबर महिन्यात लसणाची बियाणे विकत घेतले आणि लसणाची लागवड केली. लसनाच्या शेतीतून दर्जेदार उत्पादन प्राप्त करण्याच्या अनुषंगाने किशोर यांनी ठिबक सिंचन प्रणालीचा प्रभावी वापर करून योग्य पाणी आणि खताचे व्यवस्थापन केले. किशोर यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व जाणून 50 टक्के रासायनिक खतांचा व 50 टक्के सेंद्रिय खतांचा लसणाच्या पिकासाठी उपयोग केला.

लसनाचे पिक सध्या वापरात जोमाने बहरत आहे. किशोर यांना लसणाच्या शेतीतून एकरी 30 क्विंटल उत्पादन प्राप्त होण्याची आशा आहे. किशोर यांच्या मते हिंगणघाट आणि पांढरकवडा बाजारपेठेत लसणाला प्रचंड मागणी असते, त्यांना दोन एकर लसूण पिकासाठी साधारणता एक लाख रुपये उत्पादन खर्च आतापर्यंत आला आहे. त्यांना दोन एकर लसणाच्या शेतीतून पाच लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होण्याचा अंदाज आहे म्हणजे उत्पादन खर्च वजा जाता किशोर यांना सुमारे चार लाख रुपये अवघ्या शंभर दिवसात निव्वळ नफा राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

किशोर यांच्याजवळ एकूण बारा एकर वडिलोपार्जित शेतजमीन आहे आणि ते दरवर्षी सुमारे 12 ते 13 लाख रुपये शेतीतून प्राप्त करत असतात. किशोर यांचे शेती क्षेत्रातील हे दैदिप्यमान यश इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे सांगितले जात आहे.

English Summary: This farmer earn 4 lakh rupees from garlic crop
Published on: 28 January 2022, 01:12 IST