आजच्या तरुणांचा विचार केला तर शेती म्हटले म्हणजे नको रे तो व्यवसाय अशाच प्रकारची प्रतिक्रिया पाहायला मिळते. बरीचशी तरुणाईही शेती कडे यायला तयार नाहीत. याला बरीचशी कारणे देखील आहेत. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे शेतीही निसर्गावर अवलंबून असल्याने तिच्यात असलेली अनियमितता व त्यामुळे पण उत्पन्नात नसलेली शाश्वती हे प्रमुख कारण आहे.
परंतु कोरोना महामारी नंतर शेती क्षेत्राचे महत्त्व विशद झाले आहे. सगळे उद्योग धंदे ठप्प असताना कृषी क्षेत्र मात्र मोठ्या उमेदीने अशा परिस्थितीत सुद्धा तग धरून होते. मागील काही वर्षांपासून शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला शेतीनेसुद्धा एक पारंपारिक पद्धतीतून बाहेर निघून आधुनिकतेचारस्ता धरलेला आहे.आता बऱ्याच प्रकारची तरुणाईही शेतीकडे वळत आहेत. शेतीमध्ये व्यवस्थित नियोजन आणि व्यवस्थापन ठेवले तर शेती ही चांगला व्यवसाय म्हणून नावारूपाला येत आहे. या लेखामध्ये आपण अशाच एका बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या शेतकऱ्याचे अनोखे व्यवस्थापनाद्वारे केलेली शेती बद्दल माहिती देणार आहोत.
एक एकर शेती आणि उत्पन्नाला लाखात
सोमेश्वर श्रीधर लवांडे हे फत्तेपुर तालुका नेवासा येथील शेतकरी असून त्यांचे शिक्षण फक्त बारावी पर्यंत झालेले आहे. परंतु या अल्पभूधारक असलेल्या शेतकऱ्यांनी जिद्द आणि कष्टाच्या जोरावर अवघ्या त्यांच्या एक एकर शेतीमध्ये विविध प्रकारच्या देशी आणि विदेशी चारा पिकांची लागवड करून त्या माध्यमातून चांगला नफा मिळवला आहे. त्यांच्या अगोदरचे पार्श्वभूमी म्हणजे ते अगोदर शनिशिंगणापूर येथे व्यवसाय करत होते. त्यानंतर त्यांनी एका खाजगी कंपनीत काही वर्ष काम देखील केले. परंतु त्या ठिकाणी त्यांचे मन न लागल्याने त्यांनी त्यांच्या एक एकर शेती करण्याचा निर्णय घेतला वा असलेल्या शेतामध्ये काहीतरी वेगळे करून दाखवावे या उद्देशाने चारा पिकांची निवड केली.
त्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा वापर केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी नवनवीन पिकांचा शोध घेत असताना त्यांना थायलंडमधील विकसितफोरजीबुलेट सुपर नेपियर या चारा पिकांची माहिती मिळाली. त्याची पूर्ण माहिती घेऊन त्यांनी त्यांच्या शेतात लागवड केली. त्याचा परिणाम असा झाला की कमी वेळेमध्ये आधी उत्पादन आणि दुधासाठी पोषक असलेला हा चारा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आवडीचा ठरला. त्याच्या नंतर त्यांनी इंडोनेशिया, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया सारख्या ठिकाणाहून चारा वाणांची लागवड केली. लवांडे यांनी विकसित केलेल्या यशस्वी बियाण्यास फोर जी बुलेट व इंडोनेशियाचा बाहुबली असे नाव देण्यात आले आहे. एवढेच नाही तर त्यांनी दशरथ,सुबाभूळ घास, कडवळ तसेच हातग आणि राय घासाचे बियाणे तयार करून विक्री देखील सुरू केले आहे. देशभरातून या बियाण्याची मागणी ऑनलाइन पद्धतीने वाढल्याने त्यांनी गावातील इतरांची शेती करार पद्धतीने करायला घेतली असून त्यामध्ये चारा लागवड केली आहे.
विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या एक एकर शेती मधून पंधरा लाखांचा नफा कमावला आहे. विशेष म्हणजे या तरुण शेतकऱ्याने आता पंधरा मजूर कामाला असून प्लॉटची माहिती देण्यासाठी व देशभरातून येणारे फोन घेण्यासाठी चारजणनियुक्त केले आहेत. एवढेच नाही तर त्यांचे बियाणे आता भारतातच नव्हे तर बांगलादेश, सौदी अरेबिया आणि नेपाळ येथील शेतकरी देखील विकत घेत आहेत.(स्त्रोत-शेतशिवार)
Published on: 09 February 2022, 12:27 IST