Success Stories

आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती नोकरिमागे धावत आहे, सर्वांना वाटते की आपल्याला चांगली नोकरी असावी तसेच पैसे असावेत म्हणून लोक उच्च शिक्षण घेत आहेत. मात्र बरोजगरीमुळे अनेक लोकांनी घरची वाट धरलेली आहे. हिंगोलीच्या एका तरुणाने नोकरीमागे न धावता आपल्या वडिलांची जी वडिलोपार्जित शेती आहे ती करण्याचा निर्धार केला. हा तरुण आता चांगल्या नोकर वंतांना लाजवेल एवढा पैसा शेतीमधून काढत आहे. पण नक्की हा शेतकरी कोणती शेती करतोय ते पाहुयात.

Updated on 20 January, 2022 6:39 PM IST

आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती नोकरिमागे धावत आहे, सर्वांना वाटते की आपल्याला चांगली नोकरी असावी तसेच पैसे असावेत म्हणून लोक उच्च  शिक्षण  घेत  आहेत. मात्र  बरोजगरीमुळे अनेक लोकांनी घरची वाट धरलेली आहे. हिंगोलीच्या एका तरुणाने नोकरीमागे न धावता आपल्या वडिलांची जी वडिलोपार्जित शेती आहे ती करण्याचा निर्धार केला. हा तरुण आता  चांगल्या नोकर वंतांना लाजवेल एवढा पैसा शेतीमधून काढत आहे. पण नक्की हा शेतकरी कोणती शेती करतोय ते पाहुयात.

सोशल मीडियाचा योग्य वापर :

काळाच्या ओघानुसार शेतकरी आता आपल्या शेतात नवीन यंत्रणा आणत आहे. सोशल मीडियामुळे आता शेतकऱ्यांना कुठे ही जाण्याची गरज नाही जे की अगदी शेताच्या बांधावर उभा राहून शेतकरी एका क्लिकवर सर्व माहिती मिळवत आहे आणि या सोशल मीडियाचा पुरेपूर फायदा शेतकरी घेत आहेत.हिंगोली च्या वसमत तालुक्यातील पार्डी बागल गावातील गणेश बागल  या शेतकऱ्याने आपल्या वडिलोपार्जित शेतीमध्ये विदेशी भाजीपाला लावला आहे. गणेश बागल विदेशी भाजीपाला पिकवत आहेत तसेच त्यामधील बियाणे तयार करत आहेत. गणेश बागल यांची जिद्द व चिकाटी यामधून आपल्याला दिसत आहे.

बाजारपेठेच्या मागणीनुसार गणेश बागल यांनी आपल्या १० गुंठे शेतात विदेशी मिरची तसेच १० गुंठे शेतात विदेशी झुकणी व १० गुंठ्यात विदेशी टोमॅटो चे पीक घेतले आहे. गणेश बागल यांनी या शेतीचा खूप खोलवर अभ्यास देखील केला आहे. त्यांनी त्यांच्या शेतामध्ये शेडनेट सुद्धा उभा केले आहे तसेच मल्चिंग पेपर चा वापर ते गादी वाफा पद्धतीने लागवड करण्यासाठी करत आहेत.वर्षाकाठी गोड मिरची व तिखट मिरची च्या गणेश बागल यांच्या दोन बॅचेस असत्यात. टोमॅटो पिकाला ४ महिन्यांचा कालावधी तसेच झुकणी पिकाला ३ महिन्यांचा कालावधी लागतो. गणेश बागल यांनी एका कंपणीसोबत करार सुद्धा केला आहे. झुकणी पिकासाठी त्यांना प्रति किलो ला २२०० रुपये भेटतात तर तिखट मिरची मागे ८००० तसेच गोड मिरचीमागे १५७०० रुपये भेटतात.

गणेश बागल याना आता शेती करण्यास दोन वर्षे झाली आहेत. वर्षाकाठी सर्व खर्च जसे की पाणी असो किंवा खत, लागवड  आणि मजुरांचा  पूर्ण  खर्च  जाऊन ५० गुंठ्यामधून  ५८ लाख रुपयांचा फायदा राहतो. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची टंचाई आहे म्हणजेच कमी प्रमाणात असलेल्या पाण्यात ही शेती होऊ शकते असे गणेश बागल यांनी आवाहन केले आहे.

English Summary: The young man earns Rs 58 lakh a year by cultivating foreign vegetables, even the employees will be ashamed.
Published on: 20 January 2022, 06:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)