सध्या शेतीमधून जर अधिकचा नफा मिळवायचा असेल तर शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच पीक पद्धती मधील बदल आणि व्यवस्थापन खूप गरजेचे आहे. तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे शेतात कष्ट करायची तयारी असली पाहिजे. पारंपरिक शेती पद्धती चा वापर करून शेती केल्यास हातात अजिबात काहीच राहत नाही पारंपरिक शेती मध्ये कष्ट सुद्धा मोठ्या प्रमाणात करावे लागते. आणि यातून मिळणारे उत्पन्न सुद्धा खूपच कमी असते. या मुळे सध्या चा शेतकरी पारंपरिक शेती पद्धतीचा अवलंब करण्यास कमी येऊ लागला आहे.
5500 संत्राच्या झाडांची लागवड केली:
आता शेतकरी भुसार पिके घेणे टाळू लागले आहेत याचा बदली भाजीपाला शेती आणि फळबागांची लागवड करत आहेत आणि याच्या माध्यमातून बक्कळ नफा पैसे आणि उत्पन्न मिळवत आहेत. नगर तालुक्यातील वाळकी गावातील भाऊसाहेब नानासाहेब बोठे आणि सरस्वती बोठे या शेतकरी दाम्पत्याची कमालीची यशोगाथा या लेखात आम्ही सांगणार आहोत.नगर तालुक्यातील वाळकी या छोट्याशा गावात राहणारे भाऊसाहेब नानासाहेब बोठे आणि सरस्वती बोठे शेतकरी दाम्पत्याने आपल्या शेतामध्ये 3 वर्ष्यापूर्वी संत्राच्या झाडांची लागवड केली होती. योग्य पद्धतीने केलेली शेतीची मशागत आणि व्यवस्थापन यामुळे 3 वर्ष्यात संत्राची झाडे मोहराने भरून गेली. भाऊसाहेब नानासाहेब बोठे आणि सरस्वती बोठे या शेतकरी दाम्पत्याने आपल्या शेतामध्ये एकूण 5500 संत्राच्या झाडांची लागवड केली आणि यंदा च्या हंगामात ही बाग पहिल्यांदाच फळांनी भरून गेली.बागेतील फळांचा दर्जा पाहता व्यापारी वर्गाने भाऊसाहेब नानासाहेब बोठे आणि सरस्वती बोठे यांच्या संत्राच्या बागेकडे धाव घेतली आणि तब्बल 81 लाख रुपयांवर हा व्यवहार येऊन थांबला.
भाऊसाहेब नानासाहेब बोठे आणि सरस्वती बोठे या शेतकरी दाम्पत्याने 2019 साली या संत्राच्या बागेची लागवड केली. लागवडीनंतर या दाम्पत्याने सेंद्रिय शेतीवर मोठ्या प्रमाणात भर दिला होता. तसेच नगर तालुका हा एक दुष्काळी तालुका असल्याने पहिल्यांदा या दाम्पत्याने 2 कोटी लिटर क्षमता असलेले शेततळे बांधून घेतले. त्यामुळे बागेला पाण्याची अजिबात कमतरता भासली नाही. बागेला योग्य पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन ,औषधं फवारणी तसेच तणापासून झाडाचे संरक्षण केले.अंदाजे संपूर्ण 3 वर्ष्यात त्यांना 50 लाख रुपये खर्च आला आहे.यंदा च्या मृग नक्षत्र बहर धरण्यास सुरू केले. बाग नवीन असल्यामुळे बागेतील निम्म्याच झाडांना फळे आली. बागेचे योग्य व्यवस्थापन झाल्यामुळे फळांचा आकार, चव, रस, रंग,चमक आणि गोडी एकदम जबरदस्त होती. त्यामुळे बाग बघून व्यापारी वर्गाने बागेवर नजर ठेवली. व्यापारी वर्गाने संपूर्ण बाग ही 81 लाख रुपयांना विकत घेतली. या मुळे गेल्या 5 वर्ष्यात झालेला सर्व खर्च निघाला. घरातील सर्व लोकांची साथ असल्यामुळे हे शक्य झाले असे दाम्पत्याने सांगितले आहे.
भाऊसाहेब नानासाहेब बोठे आणि सरस्वती बोठे या शेतकरी दाम्पत्यानी पारंपरिक शेतीला कंटाळून फळबागांकडे वळण्याचे ठरवले आणि 3 वर्ष्यात त्यांनी आपल्या शेतात 5 हजार 500 रोपांची लागवड केली. त्यामुळे पहिल्याच हंगामात त्यांना 81लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्यामुळे त्यांचा सर्व खर्च निघाला आहे त्यामुळे त्यांच्या घरी सर्वत्र आनंदाचे वाटेवर पारंपरिक शेती करून कंटाळा आला होता. त्यामुळे फळबागेकडे वळण्याचा मार्ग सूचला. तीन वर्षांपूर्वी ५ हजार ५०० संत्रा झाडांची लागवड केली. झाडांची योग्य काळजी घेतली. यंदा पहिलाच बहार धरला. पहिल्यांदाच ८१ लाखांचा लॉटरी लागली. तीन वर्षात केलेला खर्च निघाला. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण आहे. तसेच आसपासच्या भागात या दाम्पत्याचे चांगले कौतुक सुद्धा होत आहे.
Published on: 22 February 2022, 02:03 IST