फतेहबादमधील जवळजवळ साठ टक्के लोकसंख्या कृषी व्यवसायावर अवलंबून आहे.वेळेनुसार शेतीव्यवसायाला एखाद्या मोठे व्यवसायात रूपांतरित करता येऊ शकते. मत्स्यव्यवसाय,नर्सरी,औषधी वनस्पतींची शेती, मधुमक्षिका पालन, गुळ उत्पादन हे असे व्यवसाय आहेत की ते शेती व्यवसायाची निगडित आहेत.
यासारख्या छोट्या छोट्या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकरी लाख रुपये कमवू शकतात. फतेह बाद जिल्ह्यामध्ये कमीत कमी 300 पेक्षा जास्त शेतकरी असे छोटे छोटे व्यवसाय करीत आहेत. अशा शेतकऱ्यांमध्य एक शेतकरी आहेत त्यांचे नाव आहे सुरेश जागलानहोय. आज त्यांची ओळख एक शेतकरी नाही तर एक व्यवसायिक म्हणून होते. त्यांचा मधाचा व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचा 40 लाख रुपये वार्षिक टर्नओव्हर आहे. बरेच नामांकित कंपन्या सुरेश यांच्या कडून मध खरेदी करतात.
फतेहाबाद जिल्ह्यातील जांडली कला येथील शेतकरी सुरेश जागलानयांची बिजनेस प्लॅनिगइतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी आपल्या कष्टाने लाख रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे. इतकेच नाही तर त्यांनी आपल्या मधाचा एकता ब्रँड विकसित केला आहे. सुरेश जागलान यांचे शिक्षण बीटेक झाले असून गुरु ग्राम मध्ये प्रायव्हेट नोकरी करत होते. या नोकरीमधील धावपळ आणि एकंदरीत शहरी वातावरण व तेथील लाइफ स्टाइल त्यांना पचली नाही.नंतर त्यांनी नोकरी सोडून आपल्या गावी आले आणि शेती करणे सुरू केले.
त्यांनी ठरवले होते की शेतीला व्यवसायाचे रूप देऊन त्यातच प्रगती करायची. त्यांनी माहिती काढली की मधुमक्षिका पालन या व्यवसायासाठी खर्च कमी येतो व उत्पादन चांगले मिळते. तसेच या व्यवसायासाठी जास्त जागेची ही आवश्यकता नसते.
त्यांच्या गावात त्यांच्याकडे आठ एकर जमीन असून त्यांनी आपल्या शेतामध्ये मधुमक्षिका पेटी ठेवून हा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय सुरू करताना त्यांना थोडा खर्च करावा लागला. त्यानंतर त्यांनी येत तयार मध सरळ ग्राहकांना विक्री करणे सुरू केले. त्यांची मधाची विक्री वाढत गेली तसेच त्यांनी आपल्या व्यवसायाच्या प्रसारही चांगल्या पद्धतीने केला. नंतर त्यांनी आपल्या मधाचा एकता हनी ब्रांड या नावाने रजिस्ट्रेशन करून लेबल लावून विक्री सुरू केली. याबाबत माहिती देताना ते सांगतात की त्यांचा आता वार्षिक टर्नओव्हर हा 40 लाख रुपये आहे.
सुरेश जागलान यांच्या नेतृत्वात एक शेतकरी गट असून त्यामध्ये दीडशे शेतकरी समाविष्ट आहेत. हे सगळे शेतकरी मिळून मधाचे उत्पादन घेतात. या व्यवसाय विषयी बोलताना सुरेश म्हणाले की मधुमक्षिका पालनासाठी स्वतःच्या जागेची आवश्यकता नाही. अगदी रस्त्याच्या बाजूला रिकाम्या जागेत मधुमक्षिका पेटी ठेवून हा व्यवसाय करता येतो. त्यांच्या या व्यवसायाशी जवळजवळ तीनशे लोक जोडले गेले असून त्यांना रोजगार मिळाला आहे. बरेच लोक हे मधखरेदी करून पुढे रिटेल मध्ये विकतात ( स्त्रोत - अमर उजाला)
Published on: 05 September 2021, 03:32 IST