Success Stories

कुठल्याही क्षेत्रात केवळ कष्ट, कष्ट आणि जर कष्टच केले तर यश जास्त काळ लांब राहू शकत नाही. यशस्वी होण्यासाठी कष्टाव्यतिरिक्त अजून एका गोष्टीची जोड हवी असते ती म्हणजे आपल्या कामावरती अपार निष्ठा मग ते काम अथवा व्यवसाय कुठलाही असो आणि आपण भूतकाळात किंवा वर्तमानात कुठल्याही पदावर कार्य करत असू तरीदेखील त्या गोष्टीचा देखावा करू नये, आणि आपल्या कामाप्रती किंवा व्यवसायाप्रती स्वाभिमान बाळगला पाहिजे. याचेच एक जिवंत उदाहरण समोर आले आहे ते नांदेड जिल्ह्यातून. जिल्ह्यातील लोणी येथील एका माजी नवयुवक सरपंचाने आपण सरपंच होतो या गोष्टीचा देखावा न करता शेळीपालन व्यवसायास प्रारंभ केला आणि त्यातून एक नवीन विकास मार्ग चोखाळला.

Updated on 12 February, 2022 10:16 PM IST

लोणी येथील प्रगतिशील शेतकरी व माजी नवयुवक तडफदार सरपंच विजय किसवे केवळ राजकारणातच सक्रिय होते असे नाही त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देखील ग्रहण केले आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विजय यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला, व्यावसायिक अभ्यासक्रमाची पदवी घेतल्यानंतर विजय यांना नोकरीच्या कुठल्याच वाटा दिसत नव्हत्या, म्हणून विजय यांनी वडिलोपार्जित शेती क्षेत्रात आपले नशीब आजमवायचा प्रयत्न केला, शेती क्षेत्रात उतरल्या नंतर विजय यांना जाणीव झाली की केवळ शेती करून प्रगती साध्य करणे अशक्य आहे त्यामुळे त्यांनी शेती क्षेत्राला जोडव्यवसाय म्हणून शेळीपालनाची सांगड घातली. 6 वर्षांपूर्वी त्यांनी शेळी पालन करण्याची मनाशी खूणगाठ बांधली त्या अनुषंगाने विजय यांनी उस्मानाबादी जातीच्या 15 शेळ्या आणि त्याच जातीचा एक बोकड खरेदी करून आणले. शेळी आणि बोकड खरेदी करण्यासाठी त्यांना सुमारे 1 लाख 50 हजार रुपये मोजावे लागलेत. शेळ्यांसाठी त्यांनी जवळपास पाऊण लाख रुपये खर्च करून त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था केली.

विजय यांनी मोठ्या धाडसाने शेळीपालनास सुरुवात केली, शेळीपालनासाठी त्यांनी कुठल्या प्रशिक्षण केंद्रात जाऊन प्रशिक्षण घेतले नव्हते. मात्र असे असले तरी व्यावसायिक पदवीतुन पदव्युत्तर झालेले विजय आपल्या हुशारीने आणि योग्य नियोजनाने शेळीपालनात यशस्वी झाले आहेत. शेळीचे योग्य वेळी लसीकरण करून घेणे, तसेच कुठली शेळी आजारी असेल तर तिचा लवकरात लवकर उपचार करणे, शेळी तंदुरुस्त राहाव्यात म्हणून त्यांच्या आहारावर विशेष लक्ष देणे. या लहान परंतु महत्त्वाच्या गोष्टींवर विजय यांनी लक्ष घातले आणि आज ते शेळीपालनात यशस्वी ठरले आहेत. विजय यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि योग्य नियोजनाने पंधरा शेळ्यांपासून सुरुवात केलेल्या या व्यवसायापासून चांगली मोठी कमाई केली आणि केवळ सहाच महिन्यात अजून 35 शेळ्या त्यांच्या व्यवसायात समाविष्ट झाल्या. 

एवढेच नव्हे तर त्यांनी शेळीपालनातून तब्बल पाच एकर शेत जमीन देखील विकत घेतली. विजय शेळीपालना समवेतच शेती देखील करत होते, मात्र त्यांना सालगडी मिळेना मग त्यांनी एक ट्रॅक्‍टर विकत घेतला. यामुळे विजय यांचे शेती क्षेत्रात झपाट्याने काम होऊ लागले. पूर्व मशागतीपासून ते अगदी फवारणी पर्यंत सर्व कामे ते ट्रॅक्टरद्वारे करू लागले. विजय यांच्या या यशावरून एक गोष्ट सिद्ध होते की कुठलेच काम हे छोटे नसते आणि कामाला कुठलाच धर्म नसतो.

English Summary: the graduate young farmer started goat rearing and now
Published on: 12 February 2022, 10:16 IST