Success Stories

सध्या शेतीमध्ये अनेक बदल होत चालले आहेत. शेतकरी पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेती करत आहेत. तसेच शेतकरी हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. असे असताना औरंगाबादच्या दोन सख्ख्या भावांनी पीकांचे भविष्य सांगणारे खेती ज्योतिष नावाचा डिव्हाईस तयार केला आहे. त्यामुळे याचा मोठा फायदा आता शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे.

Updated on 02 November, 2022 4:28 PM IST

सध्या शेतीमध्ये अनेक बदल होत चालले आहेत. शेतकरी पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेती करत आहेत. तसेच शेतकरी हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. असे असताना औरंगाबादच्या दोन सख्ख्या भावांनी पीकांचे भविष्य सांगणारे खेती ज्योतिष नावाचा डिव्हाईस तयार केला आहे. त्यामुळे याचा मोठा फायदा आता शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे.

सध्या बदलत्या तापमानामुळे अनेकदा पीकांवर वेगवेगळे रोग येतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याचदा आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो. मात्र तुमच्या पीकावर कोणता रोग येणार आहे हे तुम्हाला आधीच कळाले तर कसं होईल. याबाबत अनेकांना विश्वास देखील बसणार नाही. औरंगाबादच्या समीर पितळे आणि प्रतीक पितळे या सख्ख्या बंधूंनी हा वेगळाच प्रयोग केला आहे.

त्यांनी तयार केलेल्या 'खेती ज्योतिष' डिव्हाईस चक्क शेतातील पिकांचे भविष्य सांगतो. शेताच्या मध्यभागी लावलेल्या या डिव्हाईसवर सुमारे 5 एकर जमिनीचा विविध 16 मुद्यांच्या आधारे डेटा जमा केला जातो. त्याची माहिती ठेवली जाते. यामुळे पिकांवर कोणते रोग येऊ शकतो याचा अंदाज लावता येतो. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही.

'साखर कारखाने काट्यामध्ये शेतकऱ्यांचा ऊस लुटतात'

याबाबत माहिती अशी की, खेती ज्योतिष' डिव्हाइस सौरऊर्जेवर चालतो. या डिव्हाइसमध्ये सीमकार्ड असून ते इंटरनेटशी जोडले आहे. ज्यामुळे शेताचे तापमान, मातीचा ओलावा, वाऱ्याची दिशा व वेग, सूर्यप्रकाश, पाऊस किती झाला, धुके, दवबिंदू आदी माहिती एका ठिकाणी जमा होते.

आता लम्पीनंतर घोड्यांमध्ये ग्लेंडर्स रोगाचा शिरकाव, माणसांना देखील धोका,संसर्ग झाल्यास थेट मृत्यू..

यामुळे शेतकरी या माहितीच्या आधारावर रोगाची माहिती घेऊ शकतो. प्रत्येक दोन मिनिटाला 'क्लाऊड'वर माहिती पाठविली जाऊ शकते. वेगळ्या विजेच्या कनेक्शनची गरज नाही. शास्त्रशुद्ध माहिती मिळाल्यास याचा शेतकऱ्यांना फायदा होणार. आधीच माहिती मिळाल्यास योग्य वेळी फवारणी करून शेतकरी नुकसान टाळू शकणार, अशाप्रकारे हे फायदेशीर आहे.

महत्वाच्या बातम्या;
इथेनॉलच्या किमती वाढणार, खतांवर सबसिडीही मिळणार, शेतकऱ्यांना दिलासा..
एकाच दिवसात टोमॅटो 80 रुपयांवरुन 25 ते 30 रुपयांवर, शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी..
मराठवाडा टँकरमुक्त! पाण्याचा प्रश्न मिटला, भूजल पातळीत 2 मीटरची वाढ

English Summary: the future crop known advance, unique startup Pitale brothers
Published on: 02 November 2022, 04:24 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)