Success Stories

सध्या राज्यात सर्वत्र कांद्याची विक्रमी आवक होत असल्याने कांद्याला कवडीमोल दर मिळत आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील कांद्याच्या दरात होत असलेल्या घसरणीमुळे लाखो रुपयांचा फटका बसला.

Updated on 28 March, 2022 5:48 PM IST

सध्या राज्यात सर्वत्र कांद्याची विक्रमी आवक होत असल्याने कांद्याला कवडीमोल दर मिळत आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील कांद्याच्या दरात होत असलेल्या घसरणीमुळे लाखो रुपयांचा फटका बसला.

मात्र, या शेतकऱ्याने कांदा पिकासमवेतच मेथीची लागवड केली असल्याने कांद्याचे पिकातून कवडीमोल उत्पादन मिळालेले असतानादेखील या शेतकऱ्याला चांगले उत्पन्न प्राप्त झाले. खेड तालुक्यातील मौजे काळुस येथील एका शेतकऱ्याने केवळ 15 गुंठे क्षेत्रातून सहा हजार जुड्या मेथीचे उत्पादन प्राप्त केले. विशेष म्हणजे शेतकऱ्याने लागवड केलेली मेथी अवघ्या 22 दिवसात काढणीसाठी तयार झाली. या शेतकऱ्याला 22 दिवसात मेथीच्या पिकातून तब्बल 80 हजाराचे उत्पन्न मिळाले.

सध्या कांद्याच्या बाजार भावात मोठी घसरण बघायला मिळत असून बाजारपेठेत भाजीपाला वर्गीय पिकांची मोठी मागणी आहे. बाजारपेठेत मेथी तसेच कोथिंबीर पीकाला मागणी असल्याने चांगला बाजारभाव मिळत आहे.

मेथी ही आपल्या आरोग्यासाठी चांगली असल्याने बाजारपेठेतील याला उन्हाळ्यात मोठी मागणी असते. याचाच फायदा काळुस येथील शेतकरी काळुराम बाबुराव फडके यांना झाला. काळूराम यांनी सांगितले की, यावर्षी कांदा पुन्हा बेभरवशाचा ठरला असून कांदा पिकातून उत्पादन खर्च काढणे देखील अशक्य झाले आहे.

मात्र मेथीला बाजारपेठेत भाव असल्याने पदरी थोडेफार पैसे वाचले असल्याचे त्यांनी नमूद केले. मेथी पिकातुन 22 हजार जुड्या काळूराम यांना उत्पादन मिळाले. मेथीचे उत्पादन देखील चांगले मिळाले तसेच मेथीला चांगला भाव मिळाल्याने काळूराम यांना 80 ते 90 हजार रुपये उत्पन्न प्राप्त झाले.

उन्हाळी हंगामात मेथीला मोठी मागणी असते परंतु उन्हाळी हंगामात मेथीचे उत्पादन खूपच कमी होते मात्र काळुस येथील काळूराम यांनी योग्य नियोजन करून मेथीच्या पिकातून दर्जेदार उत्पादन मिळवले आहे.

संबंधित बातम्या:-

अरे कुठं नेवून ठेवलंय महावितरण! वीज जोडणी नाही तरी शेतकऱ्याला 40 हजारांची वीजबिल

Onion Price: एकाच कांद्याला दोन बाजार समितीत भिन्न भाव, व्यापाऱ्यांची मनमानी जगजाहीर

खरं काय! यामुळे कांद्याच्या दरात झाली मोठी घसरण, जाणून घ्या याविषयी

English Summary: The farmer's experiment with onion cultivation failed; Fenugreek yield saved; Record-breaking production in 15 knots
Published on: 28 March 2022, 05:48 IST