Success Stories

उस्मानाबाद : मनात जिद्द आणि इच्छाशक्ती असल्यावर माणूस कुठलेही काम सहज रित्या यशस्वी करू शकतो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतकऱ्याने अनोखा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे. कोरोनामुळे अनेक लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले. मात्र, तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथील शेतकऱ्याने लाॅकडाऊनचा पुरेपुर फायदा घेऊन शेतीत एक अनोखा प्रयोग यशस्वी केला.

Updated on 11 January, 2022 6:15 PM IST

उस्मानाबाद: मनात जिद्द आणि इच्छाशक्ती असल्यावर माणूस कुठलेही काम सहज रित्या यशस्वी करू शकतो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतकऱ्याने अनोखा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे. 

कोरोनामुळे अनेक लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले. मात्र, तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथील शेतकऱ्याने लाॅकडाऊनचा पुरेपुर फायदा घेऊन शेतीत एक अनोखा प्रयोग यशस्वी केला. 

मसला खुर्द गावातील अॅड. सोमेश वैद्य यांचे संपूर्ण कुटुंब पेरूची बाग जोपसण्यात व्यस्त होते. मनात कोणतीच कोरोनाची भीती न आणता ते आपल्या कामात व्यस्त राहिले. या दरम्यानच्या 18 महिन्यात त्यांनी पेरू बागेचा प्रयोग यशस्वी

केला. या यशस्वी प्रयोगाचे फलीत म्हणून तब्ब्ल 25 लाखाचे उत्पन्न त्यांनी घेतले आहे. पिंक वाणाच्या पेरुची लागवड करुन त्यांनी हे भरघोस उत्पन्न घेतले आहे.

गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात मजूरांच्या हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली होती. शहरातील नागरिकांनी गाव जवळ करुन पडेल ते काम करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह केला होता. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये अँड सोमेश वैद्य यांनी पेरु बागेत परिसरातील गरजू व्यक्ती आणि महिलांना नियमित रोजगार उपलब्ध करून दिला आहे. 

उत्तम नियोजनाचे फलित 

तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द गावातील अॅड. सोमेश वैद्य आणि त्याचे संपूर्ण कुटुंब पिंक वाणाची पेरुची बाग वाढवत होते. जून 2020 मधे मसला खुर्द गावात 5 एकर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डि गावात 5 एकर अशी एकुण, 10 एकर पिंक सुपर वाण जातीचा पेरू बाग लागवड केली होती. 

सर्व गोष्टींचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. याकरिता ड्रिप सिंचन, खते व पाणी झाडास उपलब्ध करून अत्यंत योग्य नियोजन द्वारे 10 हजार पेरू झाडांचे संगोपन केले आहे. शेताला कायम स्वरूपी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी त्यानी आधुनिक पध्तीने 1 एकर मधे शेततळे बांधले असून 2 विहीरद्वारे मुबलक पाणी साठा केला आहे.

विक्रमी उत्पन्न 

पेरुच्या उत्पन्नाला आता सुरुवात झाली आहे. 18 महिन्यांपूर्वी बागेची लागवड केली होती. गेल्या तीन महिन्यांमध्ये 10 एकरातील बागेत त्यांना 100 टन पेरुचे उत्पादन झाले आहे. उस्मनाबाद लातूर बेळगाव, अहमदनगर येथील व्यापारी आणि बाजार समिति मधे विकून 25 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. 

English Summary: The farmer earned an income of Rs. 25 lakhs in 18 months
Published on: 11 January 2022, 06:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)