Success Stories

बरेच शेतकरी सध्या शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करताना दिसतात.काही प्रयोगांमध्ये खूपच जास्त प्रमाणात धोका असतो. तरीही अशा प्रकारचे आर्थिक व इतर प्रकारचे धोके पत्करून शेतकरी विविध प्रयोग करतात.

Updated on 25 February, 2022 3:33 PM IST

बरेच शेतकरी सध्या शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करताना दिसतात.काही प्रयोगांमध्ये खूपच जास्त प्रमाणात धोका असतो. तरीही अशा प्रकारचे आर्थिक व इतर प्रकारचे धोके पत्करून शेतकरी विविध प्रयोग करतात.

 आपल्याला माहित आहेच की महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये काही शेतकऱ्यांनी अक्षरशः उत्तर भारतात येणाऱ्या सफरचंदाची लागवड महाराष्ट्रात सुद्धा यशस्वी करून दाखवली. इतकेच नाहीतर स्ट्रॉबेरी आणि ड्रॅगन फ्रुट सारखे फळांची लागवड सुद्धा यशस्वी केली. त्यामुळे आता बरेच शेतकरी पारंपरिक पिकांच्या नाद सोडून आधुनिक पद्धतीच्या पिकांकडे वळताना दिसत आहे. परंतु या गोष्टी करताना आवश्यकता असते ती योग्य नियोजन, मंदिर पिकाची बाजारपेठेची व्यवस्थित माहिती, कष्ट करण्याची प्रचंड तयारी यांची होय. या लेखामध्ये अशाच एका भन्नाट शेतकऱ्याची भन्नाट यशकथा आपण पाहणार आहोत.एकेकाळीसालगडी म्हणून काम करणारा हा शेतकरी आज वर्षाला करतोय 6 कोटीची उलाढाल करतोय.

 अशी आहे या शेतकऱ्याची यशोगाथा

पानकनेरगाव हे मराठवाडा विदर्भ सीमेवरील वसलेलं गाव. येथे राहणारा संतोष शिंदे हा शेतकरी. एकेकाळी सालगडी म्हणून काम करणारा आज करोडपती झाला आहे. या शेतकऱ्याने आठ एकर क्षेत्रात नर्सरी उद्योग उभारला आहे. त्यांनी एकेकाळी सालगडी म्हणून काम केले. यासोबतच त्यांनी एक गुंठा शेतीमध्ये नर्सरी व्यवसाय सुरू केला. झेंडूच्या रोपट्यांचे उत्पादन घेतले. यामधून चांगले उत्पादन मिळू लागले.

  • 8 एकरात नर्सरी चा व्यवसाय:-

 या नर्सरी व्यवसायात फायदा दिसत असल्यामुळे त्यांनी आणखी मोठी नर्सरी उभी करायची ठरवले. या सर्वात आधी त्यांनी पाण्याचे नियोजन केले. आपल्या शेतात 150 लांबी, 150 रुंदी व 6 फूट खोल अशा स्वरूपाची विहीर खोदली. चांगले पाणी लागले या विहिरीत तब्बल साडेचार लाख लिटर पाण्याची क्षमता आहे. हळूहळू नर्सरी चा व्यवसाय वाढवत शिंदे यांनी आज 8 एकरात नर्सरी चा व्यवसाय उभा केला आहे. यांनी तंत्रज्ञानाचा वापर करत मिरची, झेंडू, टोमॅटो, पपई,टरबूज, खरबूज यांसारखे अनेक दहा ते बारा प्रजातीच्या रोपट्यांचेउत्पादन घेतले आहे.

  • 6 कोटी रुपयांची कमाई :-

 यांच्या नर्सरीत आज 100 कामगारांना कामे मिळाली आहेत शिंदे हे वर्षाला जवळजवळ 6 कोटी रुपयांची कमाई करत आहेत. शिंदे हे रोपे थेट घरच्या पत्त्यावर पाठवतात यासाठी 4 तर वाहतुकीसाठी ट्रक देखील घेतले आहेत. रोपटे उत्तम दर्जाचे आहेत त्यामुळे मागणी जास्त आहे.

English Summary: the farmer earn six crore rupees in anual through nursury business
Published on: 25 February 2022, 03:33 IST