महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागाच्या परभणी जिल्ह्यातील असोला येथील प्रयोशिल शेतकरी दत्तराव नारायणराव जावळे, प्रभाकर नारायणराव जावळे, अनंत नारायणराव जावळे, ज्ञानोबा नारायणराव जावळे, लक्ष्मणराव नारायणराव जावळे, किशनराव नारायणराव जावळे या सहा बंधूंची वसमत परभणी रोडलगत असोला शिवारात काळ्या मातीच्या भारी प्रतीची जमीन आहे.
या शेतीत एकदिलाने राहून सामुहिक विचाराने विविध बागायती पिके घेवून नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत असतात. या पैकी सेवानिवृत्त कृषी संचालक (महाराष्ट्र शासन) अनंतराव नारायणराव जावळे यांच्या मार्गदर्शानातून त्यांनी क्रमाक्रमाने तब्बल पंधरा एकर शेतात ब-ही वाणाच्या खजूर पिकाची लागवड केली आहे.
मागील सहा वर्षापासून ही खजूराची झाडे फळे देवू लागली आहेत. खजूराची बाग वसमत परभणी रोडलगच दोन्ही बाजूंच्या शेतीत उभी असल्याने येणाऱ्या जाणा-यांचे लक्ष वेधून घेत आहे. मागील सहा वर्षात अनेक टन खजूर फळांचे त्यांनी यशस्वीरीत्या भरघोस उत्पादन घेतले आहे. यंदा देखील ही खजूराची झाडे फळांच्या घडांनी लदबदून गेलीय.
विधानभवनातील आंदोलन प्रकरणी राजू शेट्टी यांच्यासह 21 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता
सध्या ह्या गोड मधूर खजूर फळांना दोनशे रुपये किलोचा दर मिळतो आहे. येथील जावळे कृषी फार्मवर फळ विक्रीचा स्टाॅल लावला असून ईतर व्यापा-यांना देखील मागणीप्रमाणे फळांची पॅकिंग करुन खजूराची रवानगी करतात. आतापर्यंत खजूराच्या फळ विक्रीतून लक्षावधी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
आता दर तीन महिन्यांनी जाहीर होणार दुधाचे खरेदी दर! आतातरी दूध उत्पादकांना न्याय मिळणार.?
जावळे बंधू सांगतात की, प्रत्येक शेतक-यांनी खजूर पिकाची शेती केली तर ईतर पिकांपेक्षा अधिकचे शाश्वत उत्पन्न मिळू शकते. यामुळे शेतकऱ्यांना हक्काचे चार पैसे मिळणार आहेत. इतर फळांच्या दृष्टीने हे पीक फायदेशीर आहे.
परभणी प्रतिनिधी- आनंद ढोणे पाटील
मका लागवड, संपूर्ण माहिती जाणून घ्या
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस एफआरपीमध्ये मोठी वाढ, आता मिळणार 3150 रुपये दर
पशुसंवर्धन विभागात हजारो नोकऱ्या जाहीर, 5 जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख
Published on: 29 June 2023, 10:58 IST