Success Story: अनेक जण शिक्षण घेऊन मोठ्या कंपनीत नोकरी (job) करण्याचे स्वप्न पाहत असतात. मात्र असेही काही तरुण तरुणी आहेत जे उच्च शिक्षण घेऊन शेती करत आहेत. तसेच काही जण असे आहेत की कंपनीतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून आधुनिक पद्धतीने शेती (Modern Farming) करत लाखो रुपयांची उलाढाल शेतीमधून करत आहेत.
अशाच एका तरुणीने नोकरी करत असताना शेती करण्याचा निश्चय केला आणि कॉर्पोरेट कंपनीतील नोकरी सोडून वडिलोपार्जित जमिनीवर सेंद्रिय शेती (Organic farming) करत वार्षिक १ कोटी रुपयांची कमाई २६ वर्षीय रोजा रेड्डी ही तरुणी करत आहे.
कर्नाटकमधील (Karnataka) रोजा रेड्डी (Roja Reddy) हिने उच्चशिक्षण पूर्ण करत नोकरी शोधली. मात्र या तरुणीने शेती करण्याचे स्वप्न पहिले होते. मात्र रोजा च्या कुटुंबाची इच्छा होती की तिने उच्चशिक्षण पूर्ण करून नामांकित कंपनीमध्ये नोकरी करावी.
कुटुंबाच्या इच्छेनुसार रोजाने बीई केले आणि बेंगळुरूमधील एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळवली. मात्र कोरोना काळामध्ये अनेकांना अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम काम दिले होते. यावेळी रोजाला देखील कंपनीने वर्क फ्रॉम दिले होते. यावेळी रोजाने शेतीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.
Wheat Cultivation: गहू लागवडीचा विचार करताय तर या ३ जातींची लागवड करून मिळवा भरघोस उत्पन्न
कोरोना काळात रोजाने सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला आणि सेंद्रिय शेती सुरु केली. तसेच शेती करत असताना रोजाने तिचे कंपनीतील काम देखील सुरु ठेवले. ऑफिसचे काम संपल्यानंतर रोजा शेतामध्ये जाऊन नवनवीन प्रयोग करायची.
त्यानंतर तिने वापरात नसलेल्या जमिनीवर शेती करू द्यावी आणि सहा एकरांवर सेंद्रिय भाजीपाला फार्म उभारावा यासाठी कुटूंबाला राजी केले. त्यानंतर शेतात कोबीची सेंद्रिय लागवड केली.
जेव्हा तिने पहिल्यांदा शेती करायला सुरुवात केली तेव्हा तिच्या नातेवाईकांनी, इतर शेतकरी, गावकरी आणि अगदी फलोत्पादन विभागाच्या अधिकार्यांनी सेंद्रिय शेती तंत्राचा अवलंब केल्याबद्दल तिची थट्टा केली होती.
आनंदाची बातमी! कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसरण; पेट्रोल डिझेलही स्वस्त, जाणून घ्या नवे दर...
मात्र तिने इंटरनेटवर सेंद्रिय शेतीचा सखोल अभ्यास केला आणि सुरुवातीला बीन्स, वांगी आणि शिमला मिरची यासह सुमारे ४० विविध प्रकारच्या भाज्या वाढवल्या. तिने तिच्या पिकांसाठी जीवामृत, नीमस्त्र, अग्निस्त्र इत्यादी जैविक खते आणि कीटकनाशकेही बनवली.
सेंद्रिय शेती करत असताना तिला सेंद्रिय शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी धरपड करावी लागली. आता रोजाने संपर्क वाढवत कर्नाटकमध्ये ५०० शेतकरी जोडले आहेत.
त्यांना बेंगळुरू सारख्या शहरांमधूनही मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळू लागल्या, त्यांनी निसर्ग नेटिव्ह फार्म्स नावाने स्वतःचा ब्रँड स्थापन केला आहे, ज्याने बेंगळुरूमधील काही रिटेल आउटलेटशी देखील करार केला आहे.
सहा एकर जमिनीपासून, रोजाने आता तिची शेती ५० एकरांपर्यंत वाढवली आहे आणि टोमॅटो, सोयाबीन, गाजर, वांगी, लेडीज फिंगर, बाटली, तिखट, मिरची आणि काकडी यासह सुमारे २० प्रकारच्या भाज्या पिकवल्या आहेत. रोजा आता दररोज सुमारे ५०० किलो ते ७०० किलो भाजीपाला पिकवते आणि वर्षाला सुमारे १ कोटी रुपये कमावते.
महत्वाच्या बातम्या:
Rainfall Alert: राज्यातील या शहरांना मुसळधार पावसाचा धोका! हवामान खात्याने दिला ऑरेंज अलर्ट
शेतकऱ्यांनो सावधान! लिंबूनीच्या झाडांना लीफ मायनर कीटकांचा धोका; ही आहेत लक्षणे
Published on: 16 September 2022, 11:53 IST