Success Stories

आज आम्ही तुम्हाला अशाच सामान्य स्त्रीचे असामान्य कार्य सांगणार आहोत. नंदूरबार जिल्ह्यातील या महिलेने शेती व्यवसायात असे काही काम केले आहे की तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

Updated on 01 June, 2022 5:30 PM IST

कृषी क्षेत्रात महिलांचे योगदान अनन्यसाधारण आहे. काळ्या आईशी स्त्रीचे नाते हे फार जुने आणि तितकेच घट्ट आहे. आज महिला शेती व्यवसायात देखील नाविन्यपूर्ण प्रयोग करून यशाला गवसणी घालत आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच सामान्य स्त्रीचे असामान्य कार्य सांगणार आहोत. नंदूरबार जिल्ह्यातील या महिलेने शेती व्यवसायात असे काही काम केले आहे की तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

नंदूरबारपासून 26 किलोमीटरवरील निंबोणी गावात राहणाऱ्या रजनीताई कोकणी व त्यांच्या कुटुंबीयांनी अथक परिश्रमातून माळरानावर आमराईसह शेती फुलविली आहे. त्यांनी फुलवलेल्या या शेतीमुळे त्या अनेकांसाठी प्रेरणास्रोत बनल्या आहेत. रजनीताई कोकणी यांच्या यशाच रहस्य म्हणजे त्यांचे अथक परिश्रम. आणि याच परिश्रमांची सध्या गावात चर्चा होत आहे.

रजनीताई यांचे पती भाईदास कोकणी हे एक निवृत्त शिक्षक आहेत. भाईदास हे नोकरीनिमित्त बाहेरगावी असायचे त्यामुळे शेतीची सगळी जबाबदारी रजनीताई यांच्यावर आली. शेती अगदी खडकाळ, टेकड्यांची आणि मुरबाड होती. शिवाय पाण्याची सोयदेखील नव्हती. मात्र तरीही रजनीताईंनी या सगळ्या अडचणींचा डोंगर पार करून शेतीत क्रांती घडवून आणण्याचे ठरवले.

मराठमोळ्या शेतकऱ्यांनी करून दाखवले; आता चाळीतील खराब कांद्याची चिंता मिटली

प्रसंगी त्यांनी स्वत:च हातात कुदळ घेवून कामे केली. नंतर ट्रॅक्टरच्या मदतीने शेतीचे सपाटीकरण केले. या कामासाठी त्यांनी ट्रॅक्टर चालविणेदेखील शिकवून घेतले. या एवढ्या मेहनतीनंतर खडकाळ जमीन ही शेती कसण्यालायक तयार झाली. पाण्याचा प्रश्न तर होताच,म्हणून सुरुवातीला त्यांनी पावसाच्या पाण्यावर आधारित कोरडवाहू शेती केली. नंतर विहीर खोदून सिंचनाची सुविधा निर्माण केली. रजनीताई यांनी सर्व कामे ही नियोजनबद्ध केल्याने त्यांना हे यश प्राप्त झालं आहे.

आता शेतात त्या गहू, सोयाबीन, तूर, मका, भुईमूग, आदी पिके घेऊ लागल्या आहेत.शिवाय कांदा, लसूण, मेथी, कोथिंबीर, वांगे, मिरची, वाल- पापडी या भाजीपाला पिकांचे उत्पादनही त्यांनी घेतले आहे. एवढंच नाही तर त्यांनी भाताच्या इंद्रायणी या वाणाची तंत्रज्ञानाच्या आधाराने लागवड करून भात उत्पादनही घेतले आहे. राष्ट्रीय कृषी नवोन्मेषी प्रकल्प अंतर्गत त्यांनी एक एकर क्षेत्रात आंबा लागवडीचा वाडी प्रयोग राबविला आहे. त्यातून त्यांना चांगला नफा झाला आहे.यामध्ये त्यांनी आंब्याच्या उत्तम प्रजातीच्या 50 झाडांची लागवड केली आहे.

त्यांनी सागाच्या दोनशे रोपांची लागवड केली असून सोबत बांबू, नारळ, चिकूच्या रोपांचीही लागवड केली आहे. त्या विविध भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. उपलब्ध पाण्याचा किफायतशीर पद्धतीने वापर करण्यासाठी ठिंबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यांनी शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला. अशा प्रकारे त्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा आदर्श इतर शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.


सोबतच त्यांनी नंदूरबारच्या कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक मदतीने द्रौपदी महिला बचत गटाच्या माध्यमातून शेतकरी सुविधा केंद्र कार्यान्वित केले. सध्या त्या फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या सदस्य असून त्यांचा राष्ट्रीय महिला किसान दिनाच्या निमित्ताने कृषी विज्ञान केंद्र, नंदूरबारकडून प्रयोगशील महिला या पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचा गौरव म्हणून नुकताच राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्सद्वारे नाशिक येथे ‘प्रगतिशील किसान पुरस्कार’ त्यांना देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या: 
पुणतांबामध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होणार; आता शेतकरी घडवणार इतिहास
ऊसतोड मजुरांवर गोळीबार करणारा अटकेत; घटनेने राज्यात खळबळ

English Summary: Success story of a woman farmer of Nandurbar
Published on: 01 June 2022, 05:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)