Success Stories

हर्षदा सोनार या ८ वर्षापूर्वी पुण्यातील नामवंत कंपनीत एचआर पदावर होत्या. यावेळी त्यांना नोकरीला येता-जाता विक्रेत्यांकडे गुलाबाची फुले दिसायची. ते पाहून त्यांचे गुलाबाकडे आकर्षण वाढत गेले. मग त्याच्या मनात फुल तयार होण्यापासून ते काढणी पर्यंतचे अनेक प्रश्न निर्माण झाले. मग त्यांनी गुगलच्या माध्यमातून गुलाबाबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली.

Updated on 17 February, 2024 3:35 PM IST

Rose Farming : फेब्रुवारी महिना म्हटलं की सर्वांना आठवतो तो म्हणजे व्हॅलेंटाईन वीक. हा वीक म्हटलं की सर्वाच्या समोर येतात ती म्हणजे रंगीबेरंगी गुलाबाची फुले. पण हे फुल तयार करण्यामागे किती माणसे काम करतात. एक फुल तयार होयला किती दिवस लागतात. याचा विचार काही मोजकेच लोक करतात. असाच गुलाबाचा विचार करत असलेल्या एका महिलेला गुलाबाने गुलाब शेती करण्याकडे वळवलं आहे. यामुळे या महिलेला मोठ्या पगाराची नोकरी देखील सोडावी लागली. यामुळे पुण्यातील हर्षदा सोनार यांनी नोकरी सोडून गुलाबाची शेती फुलवली. तर चला मग जाणून घेऊयात त्याचा गुलाब शेतीचा प्रवास...

हर्षदा सोनार या ८ वर्षापूर्वी पुण्यातील नामवंत कंपनीत एचआर पदावर होत्या. यावेळी त्यांना नोकरीला येता-जाता विक्रेत्यांकडे गुलाबाची फुले दिसायची. ते पाहून त्यांचे गुलाबाकडे आकर्षण वाढत गेलं. मग त्याच्या मनात फुल तयार होण्यापासून ते काढणी पर्यंतचे अनेक प्रश्न निर्माण झाले. मग त्यांनी गुगलच्या माध्यमातून गुलाब शेतीबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली. माहिती गोळा करताना त्यांचा त्याबद्दलचा उत्साह अजून वाढला. मग त्यांनी त्यांचे पती यांच्या माध्यमातून मावळ आणि तळेगाव येथील गुलाब उत्पादकांची भेट घेऊन शेतीचे मार्गदर्शन घेतले. यावेळी त्यांनी गुलाब लागवडपासून ते गुलाब काढणी याबद्दलची सविस्तर माहिती घेतली. आणि गुलाब शेतीला २०१६ पासून सुरुवात केली.

२० गुंठ्यापासून गुलाब शेतीला सुरुवात

गुलाब शेतीची माहिती घेतल्यानंतर शिक्रापूर येथे वीस गुंठे आकाराचे पॉलिहाऊस भाड्याने घेऊन त्यांनी शेतीला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना शेतीबदल काहीच माहित नसल्याने आणि काम करणारे कामगार देखील नव्याने असल्याने त्यांना अनेक अडचणी आल्या. शेतात नवीन असल्यामुळे सगळ्याच गोष्टी त्यांनी तज्ञांना विचारून केल्या. तसंच स्वतः कामगाराबरोबर त्या शिकत गेल्या. झाडांना खत कसे आणि किती द्यायचे? किटकनाशक आणि इतर औषधे कशी फवारायची? झाडांचे कटींग, बेडींग कसे करायचे? अशा सगळ्या पद्धती शिकून त्यांनी उत्तम नियोजन केले. शेतीविषयक काहीच ज्ञान नसल्याने प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये त्यांनी बारकाईने लक्ष देत शेतीत काम केलं.

फुल नियोजन कसे आहे

एक गुलाबाच फुल तोडलं की त्या जागेवर दुसरं फुल येण्यास साधारण ४० दिवस लागतात. मग त्याप्रमाणे आम्ही लग्नसराईत दिवाळी, व्हॅलेंटाईन अशा वेगवेगळ्या सीझनला वातावरण बघून नियोजन करतो आणि त्याप्रमाणे झाडांचे कटींग, बेंडींग, क्लीपींग, खतांचा डोस कमी जास्त करणे अशा विविध गोष्टी करुन नियोजन करावं लागतं. वातावरणाचाही सगळा अभ्यास करावा लागतो असं हर्षदा सोनार सांगतात.

उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ

सुरुवातील शिक्रापूर येथे २० गुंडे पॉलिहाऊस घेऊन ४ वर्ष शेती केली. कोरोनानंतर खेड-शिवापुर येथे एक एकर पॉलीहाऊस घेऊन आता ३ वर्ष झालं शेती करत आहे. पॉलिहाऊसचे भाडे महिना ३० हजार रुपये आहे. कामगारांचे पगार, खत, किटकनाशक असे सगळे मिळून महिना ८५ ते ९० हजार रुपये खर्च आहे. यामुळे वर्षातील कमी जास्त भावांची सरासरी काढली तर प्रतिमहिना १ लाख २५ हजारांपर्यंतचे उत्पन्न हर्षदा सोनार यांना मिळते.

पुढे ते सांगतात की, गुलाबाची क्लॉलिटी नेहमीच मेन्टेन करावी लागते. त्यामुळे त्यांची फुले त्यांच्या नावावरच पुण्याच्या होलसेल मार्केट मध्ये चांगल्या दरांत विकली जातात. काहींना डायरेक दिली जातात. फुलांचे डेकोरेशन आणि बुके यांच्या ऑर्डरही स्विकारल्या जातात. फुलांचा रेट आवक आणि मागणीनुसार रोज बदल असतो. यामुळे दरात चढ-उतार होत असते. २० फुलांचा एक बंच असतो. यामुळे साधारण कमीतकमी याची किंमत ३० रुपये ते जास्तीत जास्त ३०० रुपये इतकी असते. पॉलीहाऊस मधून रोज ८०० ते १२०० फुलांची काढणी होते. गणपती उत्सवापासून व्हॅलेंटाईनच्या आठवड्यापर्यंत गुलाबाला चांगली मागणी असते. तर इतर महिन्यात कमी मागणी असते त्यामुळे दर कमी जास्त होत असतात.

शेतकऱ्यांनी मार्केट दर बघून आपले उत्पादन वाढवले किंवा कमी केले पाहीजे. तसंच शेतीकडे होणाऱ्या खर्चावर देखील लक्ष दिलं पाहिजे. यामुळे शेती उत्पादन करतानाचे होणारे नुकसान आपण आटोक्यात आणू शकतो. याचबरोबर सेंद्रीय खताचीही मदत पूर्णपणे घेता येते. ज्यामुळे खतांना लागणारा खर्च कमी होतो, असंही हर्षदा सांगतात.

व्हॅलेंटाईन वीकमध्ये फुलांना चांगली मागणी

व्हॅलेंटाईनचा आठवडा प्रेमाचा आठवडा म्हणून साजरा केला जातो. या व्हॅलेंटाईन वीकची अनेक जण वाट पाहत असतात. या वीकमध्ये अनेकांना प्रेम व्यक्त करायचे असते. यामुळे यावेळी अनेकजण गुलाबाचा आधार घेतात. त्यामुळे या आठवड्यामध्ये गुलाबाला चांगली मागणी असते. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून गुलाबाला मागणी वाढते. तर ७ ते १४ फेब्रुवारी या आठवड्यामध्ये गुलाबाला चांगला दर मिळतो.

English Summary: Success story Harshdatai who earned lakhs of income from rose cultivation
Published on: 17 February 2024, 02:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)