शेतीमध्ये काळानुरूप बदल होत असतात, आता अनेक शेतकरी रासायनिक खतांचा वापर टाळताना दिसत आहेत. रासायनिक खतामुळे जमिनीची सुपीकता तर नष्ट होतेच शिवाय यामुळे प्राप्त होणारे उत्पादन हे स्लो पोईजन सारखे काम करते. हे रासायनिक खतांच्या गंभीर परिणाम लक्षात घेता आता अनेक सुजाण शेतकरी जैविक खताचा वापर करताना दिसत आहेत. जैविक खतांमध्ये सर्वात लोकप्रिय खत म्हणून वर्मी कंपोस्टचा उल्लेख केला जातो. वर्मी कंपोस्ट अर्थात गांडूळ खत हे बनवायला सोपे तसेच यामुळे देखील लक्षणीय वाढते त्यामुळे अनेक शेतकरी गांडूळ खत वापरावा वर जास्त भर देताना दिसत आहेत. वर्मी कंपोस्ट ची वाढती मागणी हे अनेक शेतकऱ्यांसाठी एक अतिरिक्त उत्पन्नाचे साधन बनत चालले आहे. अनेक शेतकरी गांडूळ खत विक्रीतून लाखोंची कमाई करताना दिसत आहेत.
अशीच एक कहाणी आहे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एका महिला शेतकऱ्याची, ही महिला शेतकरी गांडूळ खत विक्रीतून वर्षाकाठी पाच लाखापर्यंत चांगली मोठी कमाई करते. रूपाली विजय माळी या कोल्हापूर जिल्ह्यातील एक एक आदर्श महिला शेतकरी आहेत. रुपालीची यशस्वीरित्या शेती करतात तसेच त्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय करतात. रूपाली ह्या सुशिक्षित आहेत त्यांनी समाजशास्त्र या विषयात ग्रॅज्युएशन कम्प्लीट केले आहे. रूपालीजी बारा वर्षापासून गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय करत आहेत. रुपाली माळी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना गांडूळ खत विक्री करतात, यातून त्यांना चांगली मोठी कमाई होते.
रुपाली यांनी गांडूळखत तयार करण्यासाठी घेतली ट्रेनिंग- रूपाली माळी यांनी गांडूळ खत तयार करण्यासाठी ट्रेनिंग देखील घेतली आहे. रूपाली माळी यांनी कोल्हापूर येथील कृषी विज्ञान केंद्र येथून गांडूळ खत तयार करण्याची शास्त्रीय पद्धत शिकून घेतली. सुरवातीला गांडूळ खतचा वापर त्यांनी आपल्या स्वतःच्या शेतात केला. नंतर जसजसे उत्पादन वाढू लागले तस तसे त्यांनी गांडूळ खताची विक्री करायला सुरुवात केली. पाहता पाहता त्यांच्या गांडूळ खताला मोठी प्रसिद्धी मिळाली आणि त्यामुळे मागणीमध्ये लक्षणीय वाढ झाली. गांडूळ खत प्रकल्पला चांगले यश मिळाल्यामुळे रूपालीताई यांनी स्वतःची एक कंपनी स्थापन केली व त्याला नाव दिले समर्थ ॲग्रो प्रॉडक्टस. आजूबाजूच्या पंचक्रोशीत समर्थ ऍग्रो प्रोडक्सची एक विशेष ओळख निर्माण झाली.
परराज्यात देखील माळी यांच्या गांडूळ खताला मागणी-रूपाली माळी यांचे वर्मी कंपोस्ट खत हे राज्यात तर विकले जाते शिवाय परराज्यात देखील विकले जाते यांचे गांडूळ खत ते विशेषता कर्नाटक आणि गोवा राज्यात विकले जाते. तसेच राज्यात पुणे व आजूबाजूच्या परिसरात गांडूळ खतला चांगली मागणी आहे. वर्षाला रुपाली माळी हे 35 ते 40 टन वर्मीकंपोस्ट विक्री करतात, या व्यवसायातून ते सुमारे पाच लाख रुपये वार्षिक उत्पन्न कमवितात तसेच त्यांनी सहा महिलांना देखील त्यांच्या फार्ममध्ये रोजगार दिला आहे, रुपाली माळी हे इतर महिलांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी एक आदर्श ठरत आहेत.
Published on: 17 December 2021, 09:09 IST