Success Stories

गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेती व्यवसाय तोट्यात जात असला तरी देखील काही शेतकरी बांधव योग्य नियोजन करीत आपल्या अपार कष्टाच्या जोरावर शेतीमधून चांगले उत्पन्न कमवीत आहेत. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्याच्या एका अवलिया शेतकऱ्याने देखील टरबूज या हंगामी पिकांची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पन्न कमविले आहे.

Updated on 27 April, 2022 9:34 PM IST

गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेती व्यवसाय तोट्यात जात असला तरी देखील काही शेतकरी बांधव योग्य नियोजन करीत आपल्या अपार कष्टाच्या जोरावर शेतीमधून चांगले उत्पन्न कमवीत आहेत. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्याच्या एका अवलिया शेतकऱ्याने देखील टरबूज या हंगामी पिकांची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पन्न कमविले आहे.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की नाशिक जिल्ह्यातील विशेषता कळवण सटाणा मालेगाव देवळा अर्थात कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात बागायती शेती आहे. येथील शेतकरी डाळिंब द्राक्ष या फळबाग व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करत असतात.

देवळा तालुक्यातील बहुतांशी शेतकरी मका कांदा व इतर भाजीपाला वर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. देवळा येथील विशाल बच्छाव या शेतकऱ्याने मात्र शेती मध्ये बदल करीत हंगामी पिकांची लागवड करण्याचा निर्णय घेतला.

या अनुषंगाने या शेतकऱ्याने आपली वडिलोपार्जित तीन एकर शेत जमिन तसेच आपल्या भावकीतील चार एकर शेतजमीन भागीदारीने घेत एकूण सात एकर शेत जमिनीवर शेती सुरु केली. यातील चार एकर शेतजमिनीवर त्याने टरबुज पिकाची लागवड केली. टरबुज पिकाची लागवड केल्यानंतर अवघ्या अडीच महिन्यात या अवलिया शेतकऱ्याने टरबूज पिकातून सुमारे 100 टन उत्पादन मिळवत तब्बल दहा लाखांची कमाई केली आहे. यामुळे देवळा व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील शेतकरी बांधव विशाल यांचे कौतुक करीत आहेत.

खरं पाहता विशाल गेल्या तीन वर्षांपासून टरबूज या हंगामी पिकांची लागवड करीत आहेत. याशिवाय विशाल मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे देखील उत्पादन घेत असतात. मात्र गेली दोन वर्षे कोरोनामुळे टरबूज शेतीतून विशाल यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळाले होते. मात्र हार न मानता मोठ्या जिद्दीने याहीवर्षी टरबूज पिकाची विशाल यांनी लागवड केली. फेब्रुवारीत मल्चिंग पेपर अंथरून टरबुज पिकाची लागवड केल्यानंतर ठिबक सिंचन प्रणालीचा यशस्वी वापर करत या अवलिया शेतकऱ्याने टरबुजचे यशस्वी उत्पादन घेऊन दाखवले आहे.

सध्या विशाल यांच्या टरबुज पिकाची काढणी सुरु असून आतापर्यंत 100 टन माल उत्पादित झाला आहे अजून विशाल यांना 20 टन चांगला माल उत्पादित होण्याची आशा असून दुय्यम दर्जाचा माल देखील 10 टन उतरणार असल्याची त्यांची खात्री आहे.

त्यांनी उत्पादित केलेला सर्व माल सटाणा येथील व्यापाऱ्याच्या मदतीने जम्मू-काश्मीरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवला आहे. विशाल यांनी उत्पादित केलेला शंभर टन टरबूजला दहा रुपये प्रति किलो या दराने भाव मिळाला यामुळे निश्चितच विशाल यांचा फायदा झाला असून त्यांनी इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श रोवला असल्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.

संबंधित बातम्या :

दोन दोस्तांची गजब कहानी!! शिक्षणानंतर नोकरीऐवजी शेतीला प्राधान्य; सध्या लाखोंच्या घरात उलाढाल

Successful Farmer : फक्त पाच एकरात घेतले सुमारे 125 टन खरबूजचे उत्पादन

English Summary: Success: Planted watermelon and earned ten lakhs in just two and a half months
Published on: 27 April 2022, 09:34 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)