Success Stories

गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेती व्यवसाय तोट्यात जात आहे यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावे लागत आहे. मात्र, असे असले तरी शेती करण्याची आवड आणि नवीन तंत्रज्ञान वापरून शेती केली तर तोट्याचा सौदा नाही तर यशाची गुरुकिल्ली सिद्ध होऊ शकते. हेच दाखवून दिले आहे भिलवाडा येथील शेतकरी अर्जुन लाल शर्मा यांनी. या अवलिया शेतकऱ्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि योग्य नियोजनाच्या माध्यमातून राजस्थान राज्यात प्रथम डाळिंबाचे उत्पादन घेण्याची किमया साधली आहे.

Updated on 29 April, 2022 1:13 PM IST

गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेती व्यवसाय तोट्यात जात आहे यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावे लागत आहे. मात्र, असे असले तरी शेती करण्याची आवड आणि नवीन तंत्रज्ञान वापरून शेती केली तर तोट्याचा सौदा नाही तर यशाची गुरुकिल्ली सिद्ध होऊ शकते. हेच दाखवून दिले आहे भिलवाडा येथील शेतकरी अर्जुन लाल शर्मा यांनी. 

या अवलिया शेतकऱ्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि योग्य नियोजनाच्या माध्यमातून राजस्थान राज्यात प्रथम डाळिंबाचे उत्पादन घेण्याची किमया साधली आहे. यामुळे अर्जुन यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली एक वेगळी छाप सोडली आहे शिवाय त्यांना शेतीत केलेल्या अभूतपूर्व कामगिरीबद्दल केंद्र शासनाचा ‘प्रकृतीशील किसान’ हा पुरस्कारही मिळाला आहे.

अर्जुन येथपर्यंतच थांबले असे नाही तर त्यांनी आता शेवगा या पिकाचे यशस्वी उत्पादन घेऊन दाखवले आहे. अर्जुन दरवर्षी शेवगा शेतीतुन लाखो रुपयांची कमाई करत आहेत. अर्जुन लाल सध्या 15 बिघा जमिनीवर शेवग्याचे पीक घेत आहेत. 

महत्वाच्या बातम्या :

शेतकऱ्याची यशोगाथा! या टेक्निकचा वापर करून अवघ्या दोन एकर संत्रा बागेतून मिळवले तब्बल दहा लाखांचे उत्पन्न

Successful Farmer : सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यानंतर सुरु केला पशुपालन व्यवसाय; आता करतोय जंगी कमाई

हा अवलिया शेतकरी सध्या रोपांची कापणी करत आहे.  शेतकरी अर्जुनलाल शर्मा यांनी सांगितले की, त्यांनी पहिल्यांदा राजस्थानमध्ये डाळिंबाची शेती यशस्वी करून दाखवली आहे. डाळिंबाच्या शेतीची माहिती घेण्यासाठी त्यांनी आपला महाराष्ट्र दौरा देखील केला आहे.

आपल्या राज्यातील डाळिंब उत्पादनाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर 2004 साली त्यांनी डाळिंबाची शेती सुरु केली. डाळिंबाचे चांगले उत्पादन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा 25 बिघामध्ये डाळिंबाची लागवड केली. डाळिंबाचे चांगले उत्पादन झाल्याने राज्यातील अनेक राजकारणी, प्रशासकीय अधिकारी आणि होतकरू शेतकरी अर्जुन यांची डाळिंब शेती बघण्यासाठी त्यांच्या बांधावर हजेरी लावत असतात.

डाळिंबाचे चांगले उत्पादन घेतल्यामुळे अर्जुनला दोन वेळा जिल्हास्तरावर, एकदा राज्यस्तरावर व एकदा राष्ट्रीय स्तरावर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हे निश्चितच अर्जुन यांचे शेती क्षेत्रातील यश दर्शवण्यासाठी पुरेसे आहे. अर्जुनने नाविन्यपूर्ण पद्धतीने डाळिंबाची छोटी कलमे तयार केली. याशिवाय राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी डाळिंबाची लागवड करण्यात आली.

शेतकरी अर्जुनलाल शर्मा यांनी सांगितले की, सध्या वन्य प्राणी आणि भटक्या जनावरांमुळे डाळिंबाचे उत्पादन घेण्यास मोठी अडचण येत आहे. अशा परिस्थितीत अर्जुन यांनी पीकपद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आणि आता त्यांनी ड्रमस्टिक अर्थात शेवगा शेती करण्यास सुरुवात केली आहे. 

त्यांनी सांगितले की, 15 बिघामध्ये शेवगा पिकाची लागवड झाली आहे. यातून त्यांना चांगले उत्पादन होत आहे. यामध्ये किडींचा प्रादुर्भाव कमी असल्याने वर्षातून एकदा औषध फवारावे लागते. हे पीक वन्य प्राणी किंवा भटके प्राणी खात नाहीत. एक बिघामध्ये एक लाख रुपयांचे उत्पादन मिळू शकते. असा दावा या वेळी अर्जुन यांनी केला आहे.

अर्जुन यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, शेवग्यापासून पावडर तयार केली जाते. त्या पावडरपासून कॅप्सूल तयार केले जातात, ज्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. ज्याद्वारे 300 प्रकारचे आजार नियंत्रणात येतात. शेवगा शेंगांपासून भाजी बनवली जाते, जी मानवी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यांनी सांगितले की, सध्या शेवग्याची काढणी झाली आहे. अजून दोन महिन्यांत, शेवगा परत झाडांना लागेल. निश्चितच अर्जुन यांचे हे यश इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी सिद्ध होऊ शकते.

English Summary: Success: After earning lakhs of rupees in pomegranate farming, now 'Ha' Avaliya Shevaga is earning lakhs from farming
Published on: 29 April 2022, 01:13 IST