Success Stories

मराठीतील लोकप्रिय सिनेमा म्हणून मुळशी पॅटर्न हा सिनेमा खूपच गाजला. असे असताना त्यातील एक गाणं देखील खूपच फेमस झाले ते म्हणजे स्पेशल चहाचे गाणं. यामुळे ही अभिनेत्री खूपच चर्चेत आली. असे असताना आता हीच अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे ही अभिनेत्री प्रगतशील शेतकरी आहे.

Updated on 09 March, 2022 9:20 AM IST

मराठीतील लोकप्रिय सिनेमा म्हणून मुळशी पॅटर्न हा सिनेमा खूपच गाजला. असे असताना त्यातील एक गाणं देखील खूपच फेमस झाले ते म्हणजे स्पेशल चहाचे गाणं. यामुळे ही अभिनेत्री खूपच चर्चेत आली. असे असताना आता हीच अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे ही अभिनेत्री प्रगतशील शेतकरी आहे. सध्या ती शेकडो शेतकऱ्यांना मदत करतेय. तसेच 18 कोटींची कंपनी चालवत आहे. यामुळे ती चर्चेत आली आहे. या अभिनेत्रीचे नाव मालविका गायकवाड (Malvika Gaekwad) आहे. मालविका केवळ अभिनेत्री नाही तर शेतीत रमणारी मुलगी आहे.

मालविका गायकवाड ग्लॅमर, पैसा यापेक्षा समाधान महत्त्वाचे मानते, ते समाधान तिला शेतीतून मिळाले आहे. जेव्हा तिने शेती करण्याची इच्छा बोलून दाखवली तेव्हा तिच्या नातेवाईकांनी, मित्रांनी तिला वेड्यात काढले. पण मालविका तिच्या निर्णयावर ठाम होती. पुढे तिच्याच विचाराचे दोन मित्र मिळाले आणि मालविका सेंद्रिय शेतीत रमली. इतकी की, त्यासाठी तिने मोठ्या पगाराच्या नोकरीलाही लाथ मारली. आणि ती यामध्ये यशस्वी देखील झाली आहे.

तिले 'द ऑरगॅनिक कार्बन' नावाची कंपनी देखील सुरू केली. शेतकऱ्यांना देखील याचा थेट फायदा झाला. दोन मित्रांना सोबत घेऊन ती दुग्ध व्यवसायातही उतरली. विशाल चौधरी, जयवंत पाटील आणि मालविका अशा तिघांनी 'हंपी ए 2' नावाची कंपनी सुरू केली. दूध, तूप, दही,पनीर सोबत मिल्क ऑइल, कोकोनट ऑइल यासारखे अनेक पदार्थ त्यांच्या कंपनीत बनू लागले. आज याचा मोठा विस्तार झाला आहे. तिच्यावर हसणारे आज तिलाच एक आदर्श मानतात. आता ही कंपनी तब्बल 18 कोटींच्या घरात गेली आहे. यामुळे आता ती एक यशस्वी शेतकरी बनली आहे.

सध्या वर्षाला जवळपास 4 कोटींचा नफा ते यातून कमवतात. इंजिनिअर झाल्यावर पुण्यातील एका नामांकित कंपनीत तिला गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली. काही दिवस आयटी सेक्टरमधील ग्लॅमर, पैसा तिला बरा वाटला. पण हळूहळू तिची घुसमट सुरू झाली. समाधान कुठे मिळेना. अशात तिला शेती खुणावू लागली. यामुळे तिने याकडे वळण्याचा निर्णय घेतला. यामुळे तिने शिरूर येथे दीड एकर शेती घेतली आणि या शेतीवर सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय तिने घेतला.

यामध्ये ती आज उत्तम प्रकारे शेती करत आहे. दरम्यान, एकदा जिममध्ये वर्क आऊट करताना प्रवीण तरडे यांच्या एका मित्राने तिला चित्रपटात काम करणार का? असे सहज विचारले आणि तेथूनच तिला चित्रपटाची संधी मिळाली. तिने हसून मला त्यातले काही माहित नाही पण चित्रपट काम करायला आवडेल असे म्हटले. पुढे मित्राने प्रवीण तरडे यांची भेट घालून दिली आणि मुळशी पॅटर्न मध्ये काम करण्याची संधी तिला मिळाली. मालविका ही बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या आहे.

English Summary: Special Tea Actress mulshi Pattern progressive farmer, amazed to read agricultural experiments ...
Published on: 09 March 2022, 09:20 IST