Success Stories

गर्द हिरव्या पर्णाचा महासागरात आता पिवळ्या पर्णाची उपस्थिती जाणवू लागली आहे.

Updated on 05 April, 2022 1:52 PM IST

   गर्द हिरव्या पर्णाचा महासागरात आता पिवळ्या पर्णाची उपस्थिती जाणवू लागली आहे. मागील सहा पंधरवढे ज्या पिकाची निगा आपण राखतोय ते पीक आता कापनिस येणार आहे. झाडांना आपला बोजा पेलत नाहीय त्यामुळे त्यांनी आपले वजन धरणी मातेवर टाकले आहे. शिवारात नेहमी सारखा फेरफटका मारणे जवळपास अशक्यप्राय गोष्ट झाली आहे. गेली तीन महिने असंख्य अडचणींचा सामना करत आज हे पीक आपणास उत्पन्न देणार आहे. हिरव्या शेंगांचे वजन आता वाढत आहे. झाडामध्ये साठलेली बहुतांश साखरेचे रूपांतर दाण्यात होत आहे. मातृत्वाचा भावनेने झाडं आपले सर्वस्व शेंगांकडे सुपूर्द करत आहेत.

  काही ठिकाणी शेवटचं पाणी देण्याची लगबग सुरू झाली आहे. त्या पाट पाण्यातून एकरी १०किलो म्युरेट ऑफ पोटॅश(पांढरे पोटॅश)चा वापर करावा. म्युरेट ऑफ पोटॅशचा वापरामुळे दाणे चांगले भरतात. पोटॅश ह्या अन्नद्रव्यांवर आपल्या नियोजनात महत्त्व देण्यात आले होते. 

अजूनही झाडांची मुळी चालू असल्यामुळे पालशचे शोषण होऊन आपणास उत्पादन वाढण्यास मदद होईल.आपण वेळोवेळी सुष्मअन्नद्रव्याची फवारणी घेत असतो त्यामुळे आपणास ह्या फवारणीचा फायदा दाणे भरण्याचा अवस्थेत झाला असणार. 

 काही दिवसानंतर शिवारात काही ठिकाणी झाडं वाळू लागतात. आशा वेळी समजून घ्यावे की झाडांची मुळी बंद झाली आहे. त्यामुळे जर शक्य झाल्यास म्युरेट ऑफ पोटॅश(पालाश) एक किलो प्रति एकर ह्या प्रमाणात फवारणी करावे. जमिनीतून पालाश ह्या अन्नद्रव्यांची उचल होत नसल्याने वरून फवारणी केल्यास त्याचा चांगला परिणाम आपणास मिळतो.

   झाडांची पाने वाळू लागलायस मळणीचा नियोजनाला प्रारंभ करावा. पुढील महिन्याभरात आपल्या भागात हवामान कसे राहील ह्याचा अंदाज घ्यावा. आता पर्यंत आपणास ज्या दिवशी आपण मळणी करणार आहोत त्या तारखेचाही अंदाज आला असावा. त्यादिवशी सोयाबीन कापनिस मजूर मिळावेत ह्या साठी आजपासूनच त्याचाशी गाठीभेटी करणे किंवा त्यांना तारखेचा अंदाज देने आशा कृती कराव्यात. 

ऐनवेळी मजुरस्वभावा प्रमाणे ती टोळी दांडी मारू शकते ह्याचा अंदाज घेऊन शेजारील गावातील मजुरांनाही अंदाज द्यावा. जेणेकरून ऐनवेळी होणारा मानसिक त्रास कमी होईल. मळणी यंत्राचा मालकालाही आधी काही आठवडे त्या तारखेचा नियोजनाची कल्पना द्यावी. इथेही ऐका यंत्रावर अवलंबून न राहता शेजारील गावातील यंत्रालाही कल्पना देऊन ठेवावे. इथून पुढे मळणीसाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव करावी. ताडपत्री, बारदान आणि इतर सर्व सामग्री दहा दिवस आधी आपल्या घरी हव्यात. मळणीची दिवशी बाजारात पिशवी घेऊन पळणे शाहणपणाचे ठरत नाही. 

                     मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात सोयाबीन मळणीची एक पद्धत आहे. इथे सोयाबीन कापले जाते,त्याचा ढीग मारला जातो आणि नंतर त्याची मळणी केली जाते. पण ह्या पद्धती मध्ये खूप मोठी जोखीम आहे. कापणी नंतर जर एखादा पाऊस झाला तर दाण्यांचा दर्जा खूप खराब होते. त्याच ठिकाणी जर उभ्या पिकावर वर्षाव झाला तर ह्याच दर्जामध्ये कोणतीही घट होत नाही. त्यामुळे आम्ही कापणी आणि मळणी हे एकाच वेळी करतो. त्यामुळे वरूनराजाचे अवकाळी अगमनही झाले तरीही जास्ती नुकसान होत नाही. 

आज मागील तीन महिन्यांच्या प्रवासाचा समारोप होत आहे. मागील तीन महिने शेतकऱ्यांना माहिती देताना बऱ्याच गोष्टी नव्याने अनुभवायला मिळाल्या. माझा ही शिवारातील सोयाबीन आता दाणे भरण्याचा अवस्थेत आहे. ऐका झाडाला सरासरी ११९-१२५पर्यंत शेंगा आहेत. ऐका टोकणीत ३७५-४०० शेंगा आहेत. मी आता पालाश विरघळवणारे जिवाणू वापरत आहे. त्याचा फायदा मला दाणे भरण्यासाठी होईल. ह्या प्रवासात मी आपणास बऱ्याच फवारण्या करावयास सांगितल्या आहेत. मागील वर्षी मला फक्त चार फवारण्या कराव्या लागल्या होत्या. ह्या वर्षी आजपर्यंत दहा फवारण्या झाल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेने कीड प्रचंड प्रमाणात वाढली आहे. वातावरण बदल हे आता नाकारण्यासारखा विषय राहिला नाही. इथून पुढे आपल्या अडचणी वाढणार आहेत. शतकातला सर्वात उष्ण मार्च महिन्याची अनुभूती आपण घेतली आहे. आपल्या प्रत्येक कृतीमध्ये निसर्गाचा विचार असावा.

 

जय हिंद

विवेक पाटील,सांगली

०९३२५८९३३१९

English Summary: Soybean crop last fortnight do also management
Published on: 05 April 2022, 01:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)